संभाजी ब्रिगेडचे आंदोलन
वसमत
शहर प्रतिनिधी
वसमत तालुक्यामधील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेले गाव म्हणजे कुरुंदा.
येथील महावितरण कार्यालय येथे संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते मागील ३ दिवसापासून निवेदन देण्यासाठी जात आहेत.
पण कार्यालयातील जबाबदार अधिकारी उपस्थित राहत नसल्यामुळे.
कार्यालयाच्या गेटलाच निवेदन चिटवण्यात आले.
या निवेदनामध्ये कार्तिक मास महिना सुरू झालेला आहे.
आणि कार्तिक महिना हा धार्मिक लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचा समजला जातो.
पण या महिन्यांमध्ये सकाळी ३ वाजता लाईट जाते व सकाळी ६ वाजता येते.
ह्यामुळे धार्मिक लोकांच्या भावना दुखावल्या जात आहेत
ही वेळ अत्यंत चुकीची असून वीज पुरवठा विभागाने जेवढ्या वेळामध्ये आपण लाईट देणार आहेत तेवढाच वेळ द्यावी पण वेळ बदलून सकाळी ८ वाजेपर्यंत लाईट सुरळीत रहावी जेणेकरून
अडचणी निर्माण होनार नाहीत.
आणी आपल्या विज वितरण कंपनी कार्यालया अ़तर्गत येनारे जेवढे गाव आहेत.
तेवढ्या गावांमध्ये अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम वीज वितरण कंपनीतर्फे सुरू आहे.
आणि या मुळे वीज पुरवठा हा वेळोवेळी खंडीत होत आहे खबरदारी म्हणून योग्य त्या उपाययोजना तात्काळ कराव्यात.
अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने वीज वितरण कंपनीच्या समोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा वसमत तालुका संभाजी ब्रिगेड च्या वतीने देण्यात आला आहे
या निवेदनावर संभाजी ब्रिगेड वसमत तालुका अध्यक्ष विजय डाढाले व पदाधिकरी यांच्या सह्या आहेत