वसमत.
शहर प्रतिनिधी
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त साई नगर वसमत येथे लहान बालकांचे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. या आरोग्य शिबिरास अध्यक्ष म्हणून मंचकराव देशमुख सर होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून वसमत शहर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक बोराटे सर, कुरुंदा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक मोरे साहेब , डॉ मयूर सातपुते साहेब तसेच कॉलनीतील ज्येष्ठ सदस्य तुकाराम चव्हाण सर आणि वसमत कराटे असोसिएशनचे संतोष नागरे सर उपस्थित होते. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात हुतात्मा बहिर्जी शिंदे यांच्या प्रतिमेची पूजन करून तसेच प्रसिद्ध गायक लक्ष्मीकांत जोशी यांच्या गायनाने झाली. यावेळी जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेमध्ये वसमत येथील पदक जिंकलेल्या 25 बालकांचे आणि त्यांच्या पाल्यांचे पुष्पगुच्छ आणि पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले, यामध्ये जिल्हास्तरावर गोल्ड मेडल प्राप्त गौरव धुमाळ, आदित्य पवार, संदीशा पत्रे, पियुष मुळीक, शर्वरी सैदाने. अनुष्का पवार यांचा सत्कार करण्यात आला तसेच श्रेया परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम आलेल्या उज्वल कदम, कळणे यांचाही पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना वसमत पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक श्री बोराटे सर यांनी सांगितले की लहान मुलांना प्रेरणा देणारा स्तुत्य उपक्रम असून असा उपक्रम प्रत्येक शहरांमध्ये प्रत्येक नागरिकांनी केला पाहिजे जेणेकरून लहान बालकांना प्रेरणा मिळून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होईल. तसेच एवढा सुंदर कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल बोराटे साहेब यांनी तुकाराम चव्हान सर आणि समस्त साईनगर कॉलनी वासियांचे आभार व्यक्त करून साईनगर ही कॉलनी वसमत शहरातील पहिलीच कॉलनी आहे जे की अशा पद्धतीने नवीन उपक्रम सुरू करून नवा आदर्श निर्माण केला. तसेच सध्याला चोरीच्या आणि लहान मुलांना पळविणाऱ्या टोळ्या आलेल्या बातम्या या अफवा असून कोणीही त्यावर विश्वास ठेवू नये अशी कुठे शंका निर्माण झाल्यास त्वरित आमच्याशी संपर्क साधावा असे आवाहन श्री बोराटे साहेब यांनी केले. कुरुंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजानन मोरे यांनी आयोजन कर्ताचे आभार मानून प्रतेक शहरात असे प्रेरणादायी कार्यक्रम घेण्याची गरज असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदर्श शिक्षक कैलास भाऊ सैदाने तसेच जयदीप पवार यांनी उत्कृष्ट पद्धतीने केल्याबद्दल पोलीस निरीक्षक यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले, तसेच साईनगर येथील आदर्श गणेश मंडळांचा सत्कार पोलीस निरीक्षक बोराटे साहेब मंडळा तर्फे संदीप कदम, रावसाहेब लोंढे, विजय पती आणि गणेश कोरडे यांनी स्वीकारला आयोजित करण्यात आलेल्या बालकांच्या आरोग्य शिबिरास उत्तम असा प्रतिसाद मिळालेला असून वसमत येथील प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉक्टर मयूर सातपुते साहेब यांनी उपस्थित राहून तब्बल 120 बालकांची मोफत तपासणी केली. यावेळी अशोक वडवळे यांनी सर्व उपस्थितांचे तसेच मान्यवरांचे आणि सत्कार झालेल्या बालकांचे आभार मानून पुढील काळासाठी शुभेच्छा दिल्या
साई नगरात बालकांचे आरोग्य तपासणी
Leave a comment