वसमत
प्रतिनिधि,
महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन ( MESTA) च्या वर्धा कमिटी तर्फे मुंबई उच्च़ न्यायालयाच्या नागपुर खंडपीठामध्ये दाखल करण्यात आलेल्या रिट याचिका क्रमांक 1201 / 2021 मध्ये दिनांक 16 ऑक्टोबर 2023 रोजी च्या माननीय न्यायालयाच्या निर्णयानुसार याचिकाकर्त्यांनी दाखल केलेली याचिका ही दिनांक 16 ऑक्टोबर 2023 रोजी पारित केलेल्या आदेशानुसार निकाली काढण्यात आली, सदरील न्याय निर्णयाच्या अनुषंगाने शिक्षण हक्क़ कायद्यानुसार आरक्षित असलेल्या 25 टक्के कोट्यातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक फीस शासन देत असते. परंतु राज्य़भर मागील अनेक वर्षापासुन शैक्षणिक संस्थांना आरटीई अंतर्गत 25 टक्के कोट्यातील मोफत प्रवेशाची फीपरतावा म्हणुन देय असलेली शैक्षणिक फीस शासनाने दिलेली नाही. त्यामुळे सरकार विरोधात नाराजीने मेस्टा संघटनेच्या वतीने मुंबई उच्च़ न्यायालयाच्या नागपुर खंडपीठामध्ये वर्धा जिल्हा
मेस्टा कार्यकारणीने याचिका दाखल केली होती, सदरील याचिकेच्या सुनावणी अंती उच्च़ न्यायालयाचे न्यायमुर्ती श्री देवेंद्र कुमार उपाध्याय साहेब आदरणीय न्यायमुर्ती श्री. चांदुरकर साहेब यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्याच्या दाव्याची चार आठवड्यात चौकशी करुन त्यांना देय असलेली रक्क़म ठरवण्यात यावी व त्व़रित देण्यात यावी असा आदेश उच्च़ न्यायालयाने पारित केला आहे आणि सदरील रकमेसाठी पात्र नसल्यास त्यांना त्याचे कारणे कळविण्यात यावे असा आदेश माननीय उच्च़ न्यायालयाने पारित केला अशी माहिती मेस्टा़ संघटनेचे संस्थापक अध्य़क्ष डॉ. संजयराव तायडे पाटील व विधी सल्लागार ॲङ अविनाश औटे यांनी दिली. मा. न्यायालयाच्या आदेशानुसार वर्धा जिल्हा शिक्षणाधिकारी व इतर संबंधित वरीष्ठ़ अधिकाऱ्यांनी या आदेशाप्रमाणे दिलेल्या मुदतीच्या आत कार्यवाही करावी अन्य़था मुदत संपल्याबरोबर न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याबद्दल याचीका दाखल करावी लागेल. त्याचबरोबर या निर्णयास मार्गदर्शक समजुन मा. न्यायालय नागपुर खंडपिठ यांचा आदर करत सर्व जिल्हातील अधिकारी यांनी दिपावलीच्या आत त्व़रित कार्यवाही करत सर्वच शाळांचा थकीत फीपरतावा अदा करावा अन्य़था मेस्टा़ च्या वतीने लोकशाही मार्गाने रस्यार्वरची लढाई तर लढुच परंतु संघटनेशी सलग्ऩ शाळांच्या वतीने लवकरच माननीय मुंबई उच्च़ न्यायालयाच्या मुंबई खंडपीठ, औरंगाबाद खंडपीठ तसेच नागपुर खंडपीठात इतर जिल्हांच्या वतीने लवकरच राहिलेल्या शाळांची याचिका दाखल करण्यात येईल अशी माहिती मेस्टाचे संघटनेचे संस्थापक अध्य़क्ष श्री. संजयराव तायडे पाटील आनी प्रदेश अध्यक्ष प्रा डॉ नामदेव दळवी यांनी दिली.
सदरील प्रकरणात संघटनेच्या वतीने ॲड एस. एस. शिनगारे बाजु मांडली तर शासनाच्या वतीने ॲड. ए. एस. आशीरगाडे ॲड. एन. एम. कोल्हे यांनी बाजु मांडली, दरम्यान मेस्टा वर्धा टिमचे हिंगोली जिल्हा मेस्टा चे सर्व पदाधिकारी व इंग्रजी शाळा संस्थाचालक
कौतुक करत आहेत.