शिक्षणापासून वंचीत मुलांना मोफत शिकवून शिक्षणाच्या प्रवाहात आणणारे अवलिया शिक्षक श्याम रावले
वसमत
शहर प्रतिनिधी
वसमत शहरातील आसेगाव कॉर्नर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या पाठीमागे एक वस्ती आहे या वस्तीवर अनेक जाती धर्मातील नागरिक पाल टाकून गेली अनेक वर्षे रोजमजुरी , काही कलाकार ,तर सापवाले , नंदी वाले , सर्प वाले इत्यादी लोक वस्ती करून रहातात
त्यांची मुलं शिक्षणापासून वंचित राहू नये ही प्रामाणिक भूमिका घेऊन वसमत शहरातील , तालुक्यातील सातेफल या गावातील अनुदानित शाळेतील एक पूर्णवेळ ध्येयवेड्या श्री श्याम राव रावले या शिक्षकांनी आपली नोकरी सांभाळून मागील काही महिन्यांपासून या पालावरील मुलांना शिक्षण देण्याचे ठरवून दररोज सायंकाळी हा अवलिया शिक्षक ३ ते ४ :३० मोफत शिकवणी घेत आहे , पालावरच त्यांनी ताटव्यात शाळा सुरू केली असून , या झोपडीत जवळपास ३५ मुला मुलींना ते नियमित शिकवितात
या सर्व मुलांनी त्यांनी जीवन शिक्षण गौरव मासिक च्या वतीने वह्या , पेंशील ,,उजळणी , इत्यादी साहित्य वाटप करण्यात आले आहे
या अभ्यास वर्गाला आज वसमत पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री ससाणे साहेब , शिक्षण विस्तार अधिकारी तान्हाजीराव भोसले , समनव्यक अधिकारी श्री पांडुरंग लांडगू ,यशवंतराव चव्हाण प्राथमिक शाळा मुख्याध्यापक शहा सर ,
या वेळी ३५ विद्यार्थी उपस्थित होते , त्यांना अध्यापणाचे काम श्री श्यामराव रावले करीत होते
गटशिक्षणाधिकारी साहेबांनी या वस्तीतील मुलांच्या समस्या जाणून घेतल्या त्यांच्यासाठी विशेष शिक्षण योजना तयार करून ही मुलं मूळ शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न , या शाळेतील मुलं प्रत्यक्ष अधिकारी आल्याने खूपच आनंदी होती
“””””””””””””””””””””
या पालावरील मुलांना आपली नोकरी सांभाळून दररोज दुपारी ३ ते ४ : ३० पर्यंत मोफत शिकवणी देणारे शिक्षक श्यामराव रावले यांचे शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांकडून कौतुक केले जात आहे
“”””””””””””””””””””””””””””°°°