वसमत
शहर प्रतिनिधी
वसमत तालुक्यातील पार्डी खुर्द गावातील ज्येष्ठ नागरिक
कै.मारोतराव तुकाराम नरवाडे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या मृत्यू नंतर वारकरी संप्रदायाच्या प्रथेनुसार त्यांचे सर्व सोपस्कार करण्यात आले.
जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलेल्या गाथेनुसार
जितेपणी नाही अन्न , मेल्यावरी पिंडदान !
हे तो चाळवाचाळवी , केले आपण ची जेवी !!
या अभंगाला स्मरून प्राध्यापक असलेल्या मुलानेआर्थात बालाजी नरवाडे यांनी वडिलाची खूप छान सेवा केली, त्यांच्या आरोग्यविषयक दवाखान्याच्या सेवा मृत्यूपर्यंत पूर्ण केल्या जिवंतपणी त्यांना लागणाऱ्या सर्व गोष्टी त्यांनी त्यांना उपलब्ध करून दिल्या त्यामुळे आता मृत्यु नंतर कुठलीही कर्मकांडं न करता आपले शिक्षण पुर्ण जिल्हा परिषद शाळेत झाले ती शाळा काळानुसार बदलली पाहिजे यामुळे तेरवी साठी लागणारा सर्व खर्च ना करून त्यांनी गावातील शाळा डिजिटल करण्याचा निर्णय घेतला, आपल्या वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रा.डाॅ.बालाजी मारोतराव नरवाडे यांच्या कडून जि.प.प्रा.शाळा,पार्डि(खु.)ता.वसमत,जि.हिंगोली यांना एल इ डी व दोन डिजिटल बोर्ड तेरवी कार्यक्रम ऐवजी ज्ञानदान हेच सर्व श्रेष्ठ समजून शाळेला भेट देण्यात आली आहे.त्यामूळे गावची शाळा आता जगा सोबत जोडल्या जाणार असून ती डिजिटल झाली आहे.या संकल्पने पाठीमागचा उद्देश म्हणजे आजच्या काळात अन्नाची मुबलकता ओळखून समाजात शिक्षणाविषयी असलेली उदासीनता काही ना काही प्रमाणात कमी होऊन वैचारिक मुबलकता वृद्धिंगत व्हावी एवढीच आहे.यावेळी खोब्राजी नरवाडे, विजय डाढाळे, देवराव अन्ना, गजानन डाढाळे, सोनाजी डाढाळे, कामाजी नरवाडे, कुंडलीकराव नरवाडे, श्रीनिवास नरवाडे व शेख सर इत्यादी नागरिक उपस्थित होते.