मेस्टाचे नागपूर विधान भवनावर एक दिवशीय धरणे आंदोलन.
प्रतिनिधि
मागील शैक्षणिक वर्ष 2017 18 पासून इंग्रजी
माध्यमाच्या शाळांचा थकीत आरटीओ चा निधी तातडीने निर्णय घेऊन महाराष्ट्र सरकारने द्यावा नसता पुढील शैक्षणिक वर्षापासून त्या प्रवेशावर जाहीर बहिष्कार टाकण्याचा इशारा महाराष्ट्रातील शेकडो इंग्रजी शाळा संस्थाचालक संघटनांनी नागपूर विधानभवनावरील एक दिवसीय धरणे आंदोलनात जाहीर केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील हजारो गरीब व वंचित मुलांचे गुणवत्ता पूर्ण इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील शिक्षण थांबणार आहे त्यामुळे शासनाने हा निधी लवकर इंग्रजी माध्यमांच्या शाळांना द्यावा अशी घोषणा इंग्रजी माध्यम शाळा चालक संघटना मेस्टा चे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजय तायडे पाटील यांनी घोषित केले.
महाराष्ट्रातून हजारो शाळा संस्थाचालक आणि शिक्षकांनी नागपूर येथील यशवंत स्टेडियमवर एक दिवसीय धरणे आंदोलन पुकारले होते.
त्या आंदोलनात शाळा संस्थाचालकांनी खालील मागण्या शासनाकडे केल्या आहेत.
मागील चार वर्षाची आरटीई प्रतिकृती त्वरित देणे, कोविड काळात कमी केलेला आरटीईचा निधी पूर्ववत करणे , अनावश्यक ऑनलाईन कामातून इंग्रजी शाळांना मुक्त करणे, दरवर्षीचा आरटीई चा निधी मार्च च्या आधी शाळेच्या खात्यावर जमा करणे , अनाधिकृत शाळांवर कायमची बंदी घालण्यात यावी, इंग्रजी शाळांना शालेय पोषण आहार व शासनाच्या सर्व शिष्यवृत्ती लागू करणे, इंग्रजी शाळांच्या विकासासाठी आमदार आणि खासदारांचा निधी शाळांना प्रदान करणे. या आणि इतर मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले होते.
इंग्रजी माध्यमांच्या खाजगी शाळांनी शाळांमधील विध्यार्थ्याच्या प्रवेशाबाबत शिक्षण प्रशासनातील अधिकाऱ्यांनी आपले शाळेप्रती कर्तव्य चोख बजावले आहे आणि दरवर्षी बजावत आहेत . मात्र त्याच कायद्यातील शाळांच्या विद्यार्थ्याच्या प्रतिपूर्तीची रक्कम वेळेवर अदा केली जात नाही . त्यामुळे या कायद्याचे उलंघन होते . हे दरवर्षी सुरु असल्याने शाळा संस्था चालकांवर आर्थिक संकट कोसळले असून ह्या संस्था कर्जात बुडत आहेत . त्याबाबत वारंवार विनंती , निवेदने , आंदोलने करूनही शासन आणि प्रशासन पूर्ण लक्ष देवून या कायद्याचे पूर्ण पालन करीत नाही . म्हणून उच्च न्यायालयामध्ये अनेकदा या विरुध्द खटले दाखल करण्यात आले . न्यायालयाने आदेश देवूनही त्याची अंमलबजावणी हे सरकारातील लोक करीत नाही कायद्याच्या आणि संविधानाच्या कलमांचा अपमान करतात . ही भारतीय शिक्षण पध्दतीला काळिमा फासणारी गोष्ट आहे या पुढे असे होवू नये आणि झालेला विलंब शैक्षणिक प्रतिपूर्तीची रक्कम देवून टाळावा .
आणि प्रखर अंमलबजावणी करावी व भारतीय लोकशाही आणि शैक्षणिक हक्काची जपणूक होईल यासाठी अधिवेशनात खालील मागण्यांवर चर्चा घडवून आणावी मागण्या मंजुर करून इंग्रजी माध्यमांच्या शाळांना न्याय द्यावा असे मेस्टा च्या वतीने आयोजित धरणे आंदोलना दरम्यान केले.
*धरणे आंदोलनाला आमदारांनी दिली भेट*
*सभागृहातही आमदारांनी मांडल्या इंग्रजी माध्यमांच्या समस्या*
धरणे आंदोलनाला खालील आमदारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून सभागृहात सुद्धा जाहीर पाठिंबा दिला आहे ज्यात आमदार ज्ञानेश्वर म्हेत्रे , आमदार सत्यजित तांबे , आमदार दराडे , शिक्षक सेनेचे अभ्यंकर साहेब , प्रहार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे, आमदार बच्चू कडू,
यावेळी ,
यावेळी आमदार दराडे आणि आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी प्रत्यक्ष सभागृहामध्ये निधीच्या मागणीबाबत आवाज उठविल्याबद्दल संघटनेने त्यांचे अभिनंदन व्यक्त करून आभार सुद्धा मानले.
यावेळी
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजयराव तायडे प्रदेशाध्यक्ष प्रा.डॉ नामदेव दळवी, कार्यकारी सचिव खेमराज कोंडे, नागपूर विभागाध्यक्ष डॉ .मोहन राईकवार, नागपुरी विभाग सचिव कपिल उमाळे, अनिल मोगरे नरेश भोयर मोहम्मद अरविंद नागपूर जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजाभाऊ टाकसाळे, वंदना बेंजामिन,अतुल रुईकर, सुदर्शन शिंदे, महेश कुंटूरकर आणि महाराष्ट्रातून आलेले सर्व जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष जिल्हा सचिव व जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने या धरणे आंदोलनात सहभागी झाले होते.