कु. आर्या लोखंडे ,कु. गायत्री डरंगे, कु. तेजस्विनी अडकिने विभागीय स्पर्धेसाठी पात्र.
वसमत
प्रतिनिधि,
वसमत येथील लिट्ल किंग्ज च्या विद्यार्थ्यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षा यशाची परंपरा कायम राखली आहे .
शाळेच्या इयत्ता सहावीतील तीन विद्यार्थ्यांची डॉक्टर होमी बाबा स्पर्धा परीक्षेत प्रथम स्तरावर निवड झाली असून ती सर्व विद्यार्थी द्वितीय स्तरासाठी पात्र झाले आहेत.
नुकताच डॉ होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेचा निकाल ऑनलाइन लागला असून. लिटल किंग्ज शाळेतील इयत्ता सहावी मधून तेरा विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले होते त्यापैकी आठ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून तीन विद्यार्थ्यांची दुसऱ्या स्तरासाठी निवड झाली आहे. तर नववी मधून सात विद्यार्थी परीक्षेसाठी बसले असून एक विद्यार्थी पास झाला आहे.
यात इयत्ता सहावीतील विद्यार्थ्यांनी बाजी मारली असून कू .आर्या रमाकांत लोखंडे हिने सर्वाधिक ६९ गुण घेतले आसुन, कु.गायत्री गजानन डरंगे हिला ५२ गुण तर कु. तेजस्विनी विठ्ठल अडकिने या विद्यार्थिनीला ५० गुण प्राप्त झाले आहेत.
हया तीनही विद्यार्थिनींची पुढील प्रात्यक्षिक परीक्षेसाठी निवड झाली आहे. या तिन्ही विद्यार्थिनींचे प्रात्यक्षिक परीक्षा छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे.
तर खालील विदयार्थी परिक्षा पास झाले आहेत.
कुमारी मेहता, प्रचित डोंगरे प्रथमेश पवार दिव्या खिल्लारे मनीष काळे, आयुष अंभोरे.
सर्व पात्र झालेल्या व यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन वसमत पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सुभाष सोनटक्के जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख,शाळेतील पालक ,शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी आणि शाळेचे संस्थापक प्रा डॉ नामदेव दळवी यांनी केले आहे.