वसमत
शहर प्रतिनिधी
नुकताच ज्यांचे निधन झाले ते
कातनेश्वर गावचे भुषण स्व.प्रल्हादराव हारजी चापके
पूर्णा सहकारी साखर कारखाना परिवारा सोबत चे तीस पस्तीस वर्षाचे नाते त्यांचे आयुष्यभराचे कार्य एकनिष्ठतेची अखेर योग्य दखल घेत महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाचे अध्यक्ष,माजी मंत्री श्री जयप्रकाश दांडेगावकर
आणि मा.श्री कमलकिशोरजी कदम साहेबांनी कातनेश्वर गावावर पुन्हा एकदा जो विश्वास दाखवून स्व प्रल्हाद राव चापके पश्चात त्यांचे चिरंजीव प्रकाश प्रल्हाद राव चापके यांची पूर्णा सहकारी साखर कारखाना लि.वसमत येथे स्वीकृत संचालक पदी निवड केली त्याबद्दल कातनेश्वर गावाच्या वतीने दांडेगावकर साहेबांचे ,संचालक मंडळाचे आभार मानले आहेत . उपाध्यक्ष प्रल्हाद काळे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शहाजी देसाई , गजानन धवन , नितीन महागावकर , भगवानदास धस , दिनेश बोबडे , डॉक्टर संजय रोडगे दत्तराव चव्हाण , यांनी प्रकाश चापके यांचा सत्कार करून शुभेच्छा दिले आहेत
सर्व मित्र परिवार , सर्व स्नेही आप्तेष्ट , स्व . प्रल्हादराव चापके यांचे सहकारी, गावकरी ,ऊस उत्पादक सभासद, कर्मचारी ,सर्वांनी प्रकाश चापके यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत
प्रकाश चापके यांची पूर्णाच्या स्वीकृत संचालक पदी निवड
Leave a comment