सायन्स ओलंपियाड फाउंडेशन स्पर्धा परिक्षेमध्ये शाळेची दमदार कामगिरी.
वसमत
प्रतिनिधी ,
वसमत येथील लिटल किंग्ज इंग्लिश स्कूल सायन्स ओलंपियाड फाउंडेशन नवी दिल्ली, या जागतिक पातळीवर मान्यता प्राप्त स्पर्धा परीक्षेत आंतरराष्ट्रीय गणित ओलंपियाड २०२२~२३ शेक्षनिक वर्षात या स्पर्धा परीक्षेमध्ये अत्यंत दमदार कामगिरी केली असून शाळेतील एकूण १६ मुलांना या स्पर्धा परीक्षेत गोल्ड मेडल मिळालेले आहे.
शाळेतील 95 मुलांनी या स्पर्धा परीक्षेत भाग घेतला होता.
ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात येत असून लिटल किंग्ज इंग्लिश स्कूल वसमत शाळा गणित, विज्ञान, इंग्लिश या विषयात स्पर्धा परीक्षांमध्ये मुलांची विशेष तयारी करून घेत असते .
त्याचाच एक भाग मागील इंग्रजी आणि विज्ञान या स्पर्धा परीक्षेतही मुलांनी शेकडो गोल्ड मेडल मिळवून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर शाळेचे नावलौकिक केले आहे .
आणि अनेक विद्यार्थ्यांची दुसऱ्या पातळीवर निवड झाली आहेत. हे विशेष कौतुक करण्यासारखे आहे.
विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेची भीती दूर व्हावी भविष्यात निर्माण होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये त्यांनी प्रतिनिधित्व करावे नीट, आयआयटी फाउंडेशन या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना घवघवीत यश प्राप्त व्हावे ही भूमिका ठेवून शाळा नेहमी विविध स्पर्धा परीक्षेमध्ये मुलांना बसवत असते त्याचाच एक भाग म्हणून सायन्स ओलंपियाड फाउंडेशन नवी दिल्ली यांच्यावतीने आयोजित केलेल्या इंटरनॅशनल मॅथेमॅटिक्स ओलंपियाड २०२२~२३ चा नुकताच निकाल लागला असून शाळेने या परीक्षेतही गरुड झेप घेतली असल्याचे दिसत आहे. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रिय रँक, विभागीय आणि शालेय रँक प्राप्त केला आहे.
ज्यात कू. रिद्धी सोळंके, कू.सूप्रव्हा हिरवे, आर्यन बहने , कु.समृद्धी महाजन, कु.ईश्वरी अडकिने , कू.पलक महाजन , प्रथम कदम, समर्थ महाजन , कु.दिव्या खिल्लारे , कु.तेजस्विनी अडकिने , कु.आर्या लोखंडे , कु. प्रांजली नरवाडे , कु.आर्या नायक , समर्थ
डीगूळकर, केशव कोटे , सुरज चालक या विद्यार्थ्यांचा सहभाग आहे.
ही सर्व विद्यार्थी शाळेतून नेहमी अव्वल स्थानी राहिली आहेत हे विशेष. शाळेतून हि मुलं टॉपर्स राहिली आहेत.
या यशाबद्दल शाळेचे संस्थापक प्रा. डॉ. नामदेव दळवी वसमत पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सुभाष सोनटक्के साहेब,ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी तानाजीराव भोसले , केंद्रप्रमुख पंडित सर , शाळेतील गणित त्यांचें विषयाचे शिक्षक, पालक यांनी अभिनंदन करून शुभेछा दिल्या आहेत.