प्लास्टिक मुक्त महाराष्ट्रासाठी कु. नेहाने उचलला खारीचा वाटा.
हिंगोली
शहर प्रतिनिधी
वसमत शहरातील लिटल किंग्स इंग्लिश स्कूलच्या इयत्ता दुसरीच्या कुमारी नेहा सुनिता विलास पंडित या विद्यार्थिनीने आपल्या वाढदिवसाला आगावचा कुठलाही खर्च न करता आपल्या शाळेतील सर्व शिक्षकांना कपड्या पासून बनवलेल्या आणि पर्यावरणासाठी महत्त्वाचे असणाऱ्या पिशव्या भेट देऊन आणि शाळेला एक सुंदर झाड भेट देऊन साजरा केला.
प्लास्टिक मुक्त महाराष्ट्रासाठी कु. नेहाने केलेला प्रयत्न महत्त्वाचाआसून तीने यासाठीच घेतलेला खारीचा वाटा महत्वाचा आहे.
कारण साधे बाजारात गेले तरी आई वडील व्यापाऱ्यांना प्लास्टिकची पिशवी मागतात त्यामुळे प्लास्टिक मुळे वाढती रोगराई आणि प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत असते.
सध्या मोठ्या प्रमाणात पालक आपल्या मुलांच्या वाढदिवसा वरती अमाप पैसे खर्च करत आहेत आणि वाढदिवसाला मोठाल्या पार्ट्या बॅनर लाऊन प्लॅस्टिकचा वापर करून साजरा करत आहेत.
पण लिटल किंग्ज इंग्लिश स्कूलच्या कु. नेहा आणि तिच्या आई-वडिलांनी पर्यावरण पूरक वाढदिवस साजरा करण्याचे ठरवले असल्याने शाळेमध्ये वृक्षारोपण करून आणि शाळेतील शिक्षकांना कापडी पिशव्या देऊन एक प्रकारचे बचत गटाच्या महिलांना आर्थिक पाठबळ दिले आहे . त्यामुळे तिच्या आई-वडिलांनी कु.स्नेहाला दिलेले संस्कार निश्चितच प्लास्टिक मुक्त महाराष्ट्रासाठी अत्यंत प्रेरणादायी ठरणार आहेत . कु.नेहाचे वडील विलास पंडित हे महिला आर्थिक विकास महामंडळ औंढा येथे कार्यरत आहेत आणि आई ही उच्चशिक्षित शिक्षk पदविका घेतलेली गृहिणी आहे…
त्यामुळे इतर आई-वडिलांनी हा आदर्श घेण्यासारखा असल्याचे मत लिटल किंग्ज शाळेचे संस्थापक प्रा. डॉ.नामदेव दळवी यांनी केले आहे.
नेहा चा वाढदिवस शाळेत झाड लावून आणि तिला पुस्तक रुपी भेट देऊन साजरा करण्यात आला.