वसमत
शहर प्रतिनिधी
वसुमत नगरीचे उपनगराध्यक्ष माननीय श्री सिताराम दादा म्यानेवार यांच्या 47 व्या वाढदिवसा निमित्त सदरील पुरस्काराचे आयोजन दिनांक 31 जानेवारी रोजी नारीशक्ती पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते
या कार्यक्रमाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्त्या सौ राजश्री हेमंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले शिक्षण क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा ” नारीशक्ती ” पुरस्कार सीमा भिंगोले यानां सौ राजश्री हेमंत पाटील हस्ते प्रदान करण्यात आला – सामाजिक , शैक्षणिक क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल श्री सिताराम दादा म्यानेवार मित्र मंडळाच्या वतीने या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते
सौ भिंगोले गेल्या 20 वर्षा पासून त वसुमतीनगरीत जिजाऊ कोचिंग क्लासेस च्या माध्यमातून शैक्षणिक कार्य पार पडतात त्यांचे आजपर्यंत अनेक विद्यार्थी नवोदय प्रवेश पात्र झालेले आहेत
तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांनी मोलाचे कार्य केले आहे
कोरोणा काळामध्ये त्यांनी एकाहूनअधिक पाला वरच्या कुटुंबांना दत्तक घेऊन मदत केली त्यांनी आपल्या स्वखर्चातून भोजनाची व्यवस्था केलेली आहे केली होती तसेच अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी दत्तक घेऊन त्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले आहे , त्यांना यापूर्वीही अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेआहे
महात्मा फुले शिक्षक परिषदेच्या वतीने दिला जाणारा उत्कृष्ट उद्योजक उद्योगरत्न पुरस्कार ,मराठा सेवा संघाच्या वतीने महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार 2016 , राष्ट्रमाता जिजाऊ स्वलंबन पुरस्कार 2013
असे विविध पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत अशा या कर्तुत्वान स्त्री शक्तीचा श्री सिताराम माने दादा म्यानेवार यांनी स्मृतिचिन्ह देऊन नारीशक्ती चा एक प्रकारे सन्मानच केला सदरील पुरस्कार मिळाल्याबद्दल सौ सीमा यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे