आषाढी एकादशी निमित्त दरवर्षी वृक्ष दिंडीचे आयोजन करून झाडांचे महत्व पटवून दिले जाते .
वसमत
प्रतिनिधी
वसमत शहरातील लिट्ल किंग्ज इंग्रजी शाळेच्या वतीने मागिल पंधरा वर्षापासुन वसमत शहरातून आषाढी एकादशी निमित्त दरवर्षी वृक्ष दिंडी सोहळा आयोजीत करण्यात येतं असतो ,
मागिल दोन वर्ष कोरोणा मुळे तो निघाला नाही.
या वर्षी मोठया उत्साहात हा सोहळा शाळेच्या वतीने साजरा करण्यात आला .
शाळेतील शंभर ते सव्वाशे मुले आणि मुली या वृक्ष दिंडीत सहभागी झाली होती .
महाराष्ट्राची वारकरी परंपरा टाळं मृदंगाच्या गजरात अत्यंत भक्तिमय वातावरणात झाडाचे महत्व विशद करत जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे अभंगावर अर्थात
वृक्षवल्ली आम्हा ,सोयरी !! हा संदेश घेऊन वसमत शहरातून ही वृक्ष दिंडी साजरी करण्यात आली . झाडे लावा आणि ती जगवा हा संदेश शाळेने या निमित्ताने वसमतकराना दिला.
शहरात मोठ्या प्रमाणावर या वृक्ष दिंडीवर जागोजागी पुष्पवर्षाव करण्यात आला .
तसेच जागोजागी या विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पूजनही करण्यात आले.
यामध्ये मोठ्या प्रमाणात वारकरी, नागरिक ,दुकानदार , व्यावसायिक सहभागी झाले होते .
या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विठ्ठल रुक्माई संत ज्ञानेश्वर संत तुकोबाराय संत गाडगे महाराज यांच्या वेशभूषा नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते .
पालखीमध्ये राष्ट्रसंत जगद्गुरु तुकोबाराय यांची देखणी मूर्ती ठेवून त्यांच्या समोरच एक वृक्ष ठेवून झाडांचे महत्त्व या निमित्ताने विशेष करण्यात आले.
या दिंडी सोहळ्याची विशेष तयारी मागील पाच दिवसांपासून शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विदयार्थी यांनी केली होती .
या सोहळ्यास वसमत शहर पोलिस स्टेशन, ग्रामीण पोलीस स्टेशन, वनविभाग यांनी विशेष सहकार्य केले .
दोन्ही पोलीस स्टेशन च्या वतीने सहभागी झालेल्या विद्यार्थ्याना खाऊचे वाटप करण्यात आले.