शाळेचे २० विदयार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र .
वसमत
प्रतिनिधी ,
मागील दिड दशकाच्या कालावधीत वसमतच्या लिट्ल किंग्ज इंग्लिश स्कूलने शिक्षण क्षेत्रात एक आगळे वेगळे स्थान निर्माण केले आहे.
विविध स्पर्धा परीक्षांचे आयोजन करून त्यात
सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना योग्य आणि मोलाचे मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक सामाजिक विकासासाठी काम प्रस्तुत शाळेने केलेली आहे.
यात महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेतील एकूण दहा विद्यार्थी पात्र ठरले असून. पूर्व माध्यमिक मधून दहा असे एकूण वीस विद्यार्थी या शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरले आहेत.
ज्यात पाचवी वर्गातून आरूष अंभोरे, आर्या लोखंडे, दिव्या खिलारे, गायत्री डरंगे, मनीष काळे, सोहम आवटे, तेजस्विनी आडकिने, वरद भोसले, मुक्ताई मधून आवधुत चव्हान , प्रचीत डोंगरे, तर माध्यामिक मधून अदिती दाभाडे, अक्षरा दातार, दिशा लोहटे, ईशिता माळवदकर, ओंकार पतंगे, ऋतूजा शिंदे, श्रीराम वडुळकर, सुरज चालक, तुषार आग्रवाल वैष्णवी नवघरे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सदरील विद्यार्थ्याना शाळेतील शिक्षक यांनी परिश्रम पूर्वक मार्गदर्शन केले आहे.
या शाळेतील विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षेत आणि उपक्रमात गुणवत्ता प्राप्त करण्याची एक वेगळी परंपरा राहिली आहे.
या यशाबद्दल वसमत पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सुभाष सोनटक्के, ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी तानाजीराव भोसले, केन्द्र प्रमुख पंडीत सर , शाळेचे संस्थापक प्रा डॉ नामदेव दळवी आणि शाळेतील पालकांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे .