वसमत
प्रतिनीधी ,
वसमतच्या शैक्षणिक इतिहासात विद्यार्थ्यांच्या जीवनाच्या कामी येणार शिक्षण आपल्या नवनवीन शैक्षणिक प्रयोगातून देणारी शाळा म्हणून वसमत शहरात लीटल किंग शाळेकडे पालक आशेने बघत असतात त्यामुळे कोरोणा च्या काळात सुद्धा विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये खंड न पडू देता ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षण देऊन गुणवत्तापूर्ण प्रयोग करणारी शाळा म्हणून प्रसिद्ध आहे
असे मत वसमत येथील मागील तीस ते पस्तीस वर्षापासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणारे असणारे माझी केंद्रप्रमुख केशव हिरवे यांनी मांडले ते लीटल किंग शाळेच्या शैक्षणिक वर्ष ,२०२१ ~ २०२२ चौथ्या पालक सभेत बोलत होते .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजीवनी शिक्षण संस्थेचे आणि संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रभाकर दळवी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त मुख्याध्यापक डाढाळे सर , शाळेचे संस्थापक प्रा डॉ नामदेव दळवी हे होते .
पुढे बोलताना केंद्रप्रमुख हिरवे सर म्हणाले की मी प्रशासकीय क्षेत्रात काम करत असताना सुद्धा या शाळेची गुणवत्ता तपासलेली आहे . त्यामुळे मी कुठलाही विचार न करता माझ्या निवृत्तीनंतर माझ्या दोन्ही नातवाचे प्रवेश याच शैक्षणिक संस्थेत केले आहेत . त्यामुळे आज मी समाधानी आहे . शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले गुण हेरून त्यांना नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून सतत हसत खेळत आनंददायी शिक्षण देणारी शाळा म्हणून वसमत शहरातील पालक नेहमीच आशेने या शाळेकडे बघत असतात . मग ते सतत संस्कृतीशी नाळ जोडलेली कार्यक्रम असो किंवा शैक्षणिक, वैज्ञानिक आणि विद्यार्थ्यांच्या जीवनाचे काम येणारे शिक्षण असो
अनेक आनंददायी प्रयोगांमधून ही शाळा विद्यार्थ्यांच्या अंगी बाणवत असते याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे .
पालकांनी आपला पदरमोड करून या शाळेला सतत सहकार्य करावे तरच हा शिक्षणाचा ज्ञानयज्ञ सतत तेवत राहून आपल्या पाल्याच्या जीवनात नक्कीच आनंद निर्माण करेल याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे असे त्यांनी सांगितले.
यावेळी संजीवनी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर प्रभाकर दळवी म्हणाले की कोरोणाच्या काळात ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या हातात सतत मोबाईल असल्यामुळे सध्या त्यांचे खूप मोठ्या प्रमाणात मानसिक आणि शारीरिक नुकसान होत आहे . त्यामुळे पालकांनी आता शाळा ऑफलाईन सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या मोबाईल वरती कंट्रोल करणे गरजेचे आहे . सध्या ते ज्ञानाचे भांडार असले तरी विद्यार्थ्यांची पुस्तकाची नाते खूप महत्त्वाचे आहे त्यांच्या अंगी असलेले गुण केवळ पुस्तकाच्या माध्यमातूनच विकसित होतात त्यामुळे भविष्यात पालकांनी मोबाईल चे दुष्परिणाम ओळखून त्याचा कमीत कमी वापर करून विद्यार्थ्यांची पुस्तकाची नाते निर्माण करावे असे मत व्यक्त केले .
यावेळी शाळेचे संस्थापक अध्यक्ष यांनी शाळेची मागील सोळा वर्षातील यशस्वी परंपरा पालकांसमोर व्यक्त केली भविष्यात ही शाळा विद्यार्थ्याच्या जीवनातील दिशादर्शक ठरविण्यासाठी , सतत नवनवीन शैक्षणिक प्रयोग करणार असल्याची ग्वाही यावेळी उपस्थित पालकांना दिली पुढील शैक्षणिक वर्षाचे नियोजन कशा पद्धतीने असेल याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक गोविंद दळवी यांनी दिली कार्यक्रमाच्या सुरुवातीला सावित्री जिजाऊंच्या प्रतिमांचे पूजन करून शाळेतील संगीत विभागाचे प्रमूख सिद्धार्थ खंदारेसर यांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने पाहुण्यांचे सुंदर स्वागत गीताने स्वागत केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभागाचे विभाग प्रमुख सईम पिराजी यांनी केले , तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक गोविंद दळवी यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात पालकांची उपस्थिती होती.