{हर हर महादेवाच्या जयघोषाने मंदिर परिसर गजबजला}
हिंगोली विशेष
औंढा नागनाथ
हर हर महादेव, बम बम भोले,नागनाथ महाराज की जय या जयघोषांमध्ये 25 फेब्रुवारी रात्री दहा वाजता महाशिवरात्री निमित्त येथील आठवे ज्योतिर्लिंग नागनाथ मंदिरामध्ये लाखो भाविकांच्या उपस्थितीत रथोत्सवाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. श्रीक्षेत्र औंढा नागनाथ येथील महाशिवरात्र निमित्त 25 फेब्रुवारी उत्सवाला भाविकांची अलोट गर्दी झाली होती. यावेळी पोलिस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. श्रीक्षेत्र औंढा नागनाथ येथे महाशिवरात्रीच्या उत्सवाचे मुख्य आकर्षण असणारा रथोत्सव असल्याने दुपारपासूनच हजारो भाविकांची गर्दी होती. श्री नागनाथाची उत्सवमूर्ती रथामध्ये ठेवून रथाची फुलांच्या माळा आणि दिव्याद्वारे सजावट करण्यात आली. रात्री 10 वाजेच्या सुमारास रथाच्या मंदिराभोवती पाच प्रदक्षिणा मारण्यास सुरुवात झाली. यावेळी उपस्थित भाविकांनी हर हर महादेव, ओम नमः शिवाय ,नागनाथ महाराज की जय, बम बम भोले हा गजर केला होता. 1948 मध्ये झालेल्या घटनेमध्ये तीन हुतात्मे शहीद झाले होते. यात गणपत ऋषी ,शंकर पाठक, रंगनाथ सुरवाडकर यांना तसेच सन 2011 मध्ये सतीश पाठक यांचे रथ मिरवणुकीत अपघाती निधन झाले होते. त्यांनाही आदरांजली अर्पण करण्यात आली. दरम्यान रथोत्सवास देवस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या हस्ते श्री ची पूजा करण्यात आली. खासदार हेमंत पाटील, आमदार संतोष बांगर, जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार, नगराध्यक्षा विजयमाला मुळे ,उपनगराध्यक्षा वच्छलाबाई देशमुख सह सहसचिव विद्याताई पवार, विश्वस्त गणेश देशमुख, डॉ पुरुषोत्तम देव, आनंद निलावार, प्रा देवीदास कदम, डॉ किसन लखमावार,डाँ विलास खरात, गजानन वाखरकर,अँड मुजाभाऊ कदम , शिवाजी देशपांडे, प्रा पंजाब गव्हाणकर, रमेश बगडिया, वकील रंभाजी कदम ,पुजारी रवी भोपी, नगरसेवक राम कदम, बाळासाहेब साळवे,मनोज देशमुख, अनिल देशमुख ,दता शेगुकर ,बाळासाहेब देशपांडे, प्रमोद देव, संजय पाठक,विष्णू जाधव,रामभाऊ मुळे, कृष्णा ऋषी, अनिल शिंदे, श्रीपाद दीक्षित, डॉ राम जयस्वाल, गगाधर देवकते ,सुरजीतसिंह ठाकुर,निळकठ देव,बापूराव देशमुख, शंकर काळे,कृष्णा पाटील ,आनिल देव,अनिल पाठक,लक्ष्मण सोनटक्के ,नागेश माने, गजानन वाशीमकर ,विलासराव काचगुडे ,गगाधर देवकते ,अनिल पाटील ,प्रल्हाद पोपळघट ,आदीसह जवळपास दोन लाखाहून अधिक भाविकांची उपस्थिती होती.रथ फिरवताना भजनी मंडळ व बँडवाले पथके तसेच नागेश्वर शाळेमधील विद्यार्थी ढोल ताशामध्ये सहभागी झाले होते. रथउत्सवप्रसंगी कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी घेत उपविभागीय पोलिस अधिकारी अब्दुल गणी खान यांच्यासह पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे, पोलीस उपनिरीक्षक शंकर वाघमोडे आदींनी चोख बंदोबस्त ठेवला होता.