वसमत
प्रतिनिधी
कुरुंदा येथे अतिवृष्टी व महापुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी व गावकऱ्यांना व शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंतभाऊ पाटील यांचे प्रतिनिधी म्हणून त्यांच्या अर्धगिनी सौ राजश्रीताई हेमंत पाटील यांनी नुकतीच भेट दिली असून
,नदीचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यासाठी खासदार साहेबांनी मा . जिल्हाधिकारी साहेबांशी मार्चमध्येच बोलणं केलं होतं पण नंतर कोरोनामुळे हा विषय थोडा मागे पडला ,
पण कुरुंदयाला भेडसावणारा हा महापुराचा विषय कायमस्वरूपी निकाली काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले यावेळी त्यांच्यासोबत कुरुंदा येथील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी , नेते व कार्यकर्ते उपस्थित होते