” घरगुती शिवजयंती सजावट स्पर्धा “
वसमत
शहर प्रतिनिधी
घरगुती शिवजयंती सजावट स्पर्धा हा उपक्रम वसमत येथील लीटल किंग्ज इंग्लिश स्कूलच्या वतीने या वर्षीपासून सुरू करण्यात आला आहे, त्यामागचा उद्देश म्हणजे छत्रपती शिवरायांचे चरित्र घराघरात पोहोचविण्यासाठी लहान मुलांच्या मनात शिवराया विषयी आकर्षण व सत्य इतिहास जाणून घेण्याची प्रेरणा निर्माण करणे हा आहे , आज महाराष्ट्र , देश आणि जगात शिवजयंती दि १९ फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरी होत असते , तो लोकोत्सव व्हावा यासाठी ” शिवजयंती सजावट स्पर्धेचे ” आयोजन वसमत येथील लिटल किंग्स इंग्लिश स्कूलच्या वतीने करण्यात आले आहे
लहान मुलांमध्ये नवनिर्मितीची क्षमता निर्माण होऊन भविष्यात मोठे कलावंत व विचारवंत तयार होऊ शकतात घराघरात शिवजयंती झाली की प्रत्येकाच्या मनामनात ऊर्जा निर्माण होते शिवचरित्राचा प्रचार व प्रसार झपाट्याने होण्यास त्यामुळे मदत होऊ शकते अजूनही छत्रपती शिवराय अमुक – – – अमुक यांचे तमुक तमुक यांचे असे सांगण्याचे प्रयत्न अनेकांकडून होत असताना दिसतात , असले विचार हाणून पाडण्यासाठी व तशा कृती छाटण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा सत्य इतिहास जगासमोर येण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व जाती धर्म पंथ समुदायांचे आणि या देशाचे चरित्र आणि चारित्र्य होते हे संस्कार बालमनावर व्हावेत म्हणून लहान मुलांमध्ये ती प्रेरणा निर्माण करण्यासाठी शाळेने यावर्षीपासून ” शिवराय मनामनात शिवजयंती घराघरात ” हा उपक्रम सुरू केला आहे या उपक्रमात लिटल किंग्ज इंग्लिश स्कूलचे इयत्ता दुसरी ते नववी पर्यंतचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात , या उपक्रमात सहभागी होत असताना प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःच्या घरी दि 19 फेब्रुवारी 2020 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि चरित्र ठेवून शिवजयंती साजरी करायची आहे व त्याचा एक फोटो आपल्या कुटुंबासहित आपल्या शाळेच्या वर्ग शिक्षकांच्या आणि त्या– त्या विद्यार्थ्यांच्या वर्गाच्या ग्रुप वर पाठवायचा आहे
त्यातुन प्रथम , द्वितीय आणि तृतीय असे पारितोषिक काढण्यात येतील प्राथमिक गटातून इयत्ता दुसरी ते सहावी आणि माध्यमिक गटातून सातवी ते नववी अशा दोन गटांत मधून प्रथम , द्वितीय तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे एक हजार रुपये सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र , द्वितीय येणाऱ्या विद्यार्थ्यास सातशे एक रुपये सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र आणि तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यास 501 रुपये सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे पुरस्कार मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये देण्यात येतील असे
तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी होऊन ” शिवराय मनामनात शिवजयंती घराघरात ” हा प्रयोग आपण यशस्वी करावा व विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आव्हान शाळेचे मुख्याध्यापक गोविंद दळवी शाळेच्या संचालिका मीना इंगोले शाळेचे संस्थापक प्रा. नामदेव दळवी यांनी केले आहे.