वसमत,
तालुक्यातील मौजे महागाव येथे ग्रामपंचायत कडून झालेल्या कामांचा भुमी पुजन व लोकार्पण सोहळा पार पडला यामध्ये प्रामुख्याने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महागाव डिजिटल करण्यात आली व सभामंडप विविध रोड गावातील नागरिकांना पिण्याचे पाणी शुद्ध मिळावे यासाठी पाणी फिल्टर गावात कचरा व्यवस्थापन व्हावा यासाठी कचरा कुंडी वाटप करण्यात आले अशा अनेक विकास कामांचा ग्रामपंचायत च्या वतीने लोकार्पण करण्यात तर काही कामांचे भूमिपूजन झाले ते कामे कामे येत्या काही दिवसांत पुर्ण होतील असे महागाव चे उपसरपंच तथा संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील महागावकर यांनी सांगितले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बालासाहेब जाधव तर प्रमुख उद्घाटक म्हणून संभाजी ब्रिगेड चे अध्यक्ष मनोज दादा आखरे व शिवसेना तालुकाप्रमुख प्रमुख राजू चापके तर प्रमुख पाहुणे तानाजी भोसले हे होते विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी रामकिशन झुंझुल्डे, बंडू पाटील, छत्रपती सोनटक्के, अनिल सोनटक्के, विविध गावातील संभाजी ब्रिगेड चे पदाधिकारी व गावातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते
महागाव येथे संभाजी ब्रिगेड अध्यक्ष अॅड मनोज आखरे व जि. प. सदस्य राजू चापके यांच्या हस्ते विविध विकास कामांचा लोकार्पण व भुमी पुजन सोहळा
Leave a comment