जागर स्त्री शक्तीचा
नवमहानायिकेंचा नऊ दिवस केला जागर
हिंगोली
प्रतिनिधी
वसमत शहरातील एक प्रयोगशील शाळा म्हणून प्रसिद्ध असलेली आणि नवनवीन संकल्पातून एक आगळा वेगळा परिवर्तनवादी विचार समाजातील सर्व जातीधर्मातील मुलांना जीवन शिक्षण देणारी शाळा म्हणून पुढे येत आहे ती म्हणजे लिटल किंग्ज इंग्लिश स्कूल
दसरा सणाच्या निमित्ताने या शाळेचे संस्थापक प्रा नामदेव दळवी आणि त्यांच्या सहचरिणी मीना नामदेव दळवी यांच्या शाळेत इयत्ता नववी मध्ये शिकणारी त्यांचीच कन्या कु .कल्याणी नामदेव दळवी आणि कु सृष्टी नामदेव दळवी ह्या विद्यार्थिनीच्या माध्यमातून एक नवा संदेश दिला आहे
नवरात्रीच्या माध्यमातून ” जागर स्त्री शक्तीचा नवमहानायिकांचा ” हे ब्रीद घेऊन या सणाच्या माध्यमातून नवरात्रीत नऊदिवस नऊ महा नायिकांचे पूजन करण्यात आले , आणि त्यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला , आणि दसऱ्याच्या दिवशी शैक्षणिक साहित्य ,शिकण्यासाठी वापरण्यात येणारे विविध शास्त्र यांचीही पूजा करण्यात आली .
महाराष्ट्र नवनिर्माण करणाऱ्या महाराष्ट्रातील क्रांतिकारक ज्या स्त्रिया होऊन गेल्या , ज्यांनी जगापुढे आपल्या जीवनकार्यातून एक संदेश सर्व जाती धर्मातील लोकांपुढे ठेवला त्यांच्या चरित्राचे वाचन करून पूजन करण्यात आले
त्या नवनायिका म्हणजे
ज्यात स्वराज्य संकल्पिका छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज घडविणाऱ्या राजमाता जिजाऊ,पुण्यात जगातली पहिली मुलींची शाळा काढणाऱ्या सावित्रीबाई फुले , पहिल्या महिला संपादिका तान्हुबाई बिर्जे , छत्रपती शाहू महाराज नन्तर कोल्हापूरच्या स्वराज्याची गादी यशस्वी सांभाळणाऱ्या महाराणी ताराराणी भोसले , मातंग समाजात क्रांती घडविणारी सांगा आमचा धर्म कोणता हा व्यवस्थेला प्रश्न विचारणारी मुक्ता साळवे , सावित्रीबाई फुले यांच्या मुलींच्या शाळेत पहिल्या मुस्लिम शिक्षिका म्हणून काम करणाऱ्या फातिमाबी शेख , स्त्री पुरुष समानतेवर लिहिणाऱ्या पहिल्या क्रांतिकारक महिला ताराराणी शिंदे , पहिल्या महिला संपादिका तान्हुबाई बिर्जे , डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना परिवर्तनात सक्षमपणे साथ देणाऱ्या रमाई आंबेडकर , छत्रपती राजाराम महाराज यांच्या मृत्यू नन्तर तब्बल 4 वर्ष छत्रपती शाहू महाराजांनी उभं केलेलं स्वराज्य सांभाळणाऱ्या रणरागिणी ताराबाई भोसले ,
सासऱ्याच्या मृत्यूनंतर 29 वर्ष राज्यकारभार सांभाळणाऱ्या अहिल्याबाई होळकर या नऊ नायिकांचे नऊ दिवस पूजा करून त्यांच्या चरित्राचे वाचन करून शेवटी दसऱ्याच्या दिवशी शास्त्र पूजनाचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला .
या शास्त्र पूजनात शाळेतील विद्यार्थी यांचे प्रवेश निर्गम , हजऱ्या , शैक्षणिक साहित्य , सध्या विज्ञान युगात शाळेतील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याची भूमिका निभावनार लेपटॉप , इंटरनेट , शाळेतील मुलांना ने आन करणाऱ्या स्कूल बस , शाळा परिसरातील वृक्ष , विज्ञानाची प्रयोगशाळा , संगणक यांची पूजा करण्यात आली
यावेळी लिटल किंग्ज शाळेची विद्यार्थीनी कु कल्याणी दळवी , कु सृष्टी दळवी
मुख्याध्यापक गोविंद दळवी , शिक्षिका शितल वाघणारे , संस्थापक प्रा नामदेव दळवी यांची उपस्थिती होती
या शाळेने राबविलेल्या आगळ्या वेगळ्या दसरा पूजनाचे परिसरात कोतूक होत आहे