जिल्ह्यातील पाचही तालुक्यातून सहभागी होणार बालवैज्ञानिक
वसमतमधील शाळांना पहायला मिळणार विज्ञान महोत्सव
वसमत
शहर प्रतिनिधी ,
राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर व शिक्षण विभाग जिल्हा परिषद माध्यमिकआणि लिटल किंग्ज इंग्लिश स्कूल वसमत
यांच्या संयुक्त विद्यमाने वसमत येथील लिटल किंग्स इंग्लिश स्कूल ज्ञानगंण परिसर असेगाव रोड वसमत ता, वसमत , जिल्हा ,हिंगोली येथे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन दिनांक 28 जानेवारी ते 30 जानेवारी 2020 रोजी संपन्न होत आहे या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात हिंगोली जिल्ह्यातील पाचही तालुक्यातील तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम द्वितीय तृतीय आलेले अनेक शाळांचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर एच ,पी , तुम्मोड यांच्या हस्ते संपन्न होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंगोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री गणाजी बेले हे उपस्थित राहणार आहेत प्रमुख पाहुणे म्हणून हिंगोली जिल्ह्याचे खासदार हेमंत पाटील कळमनुरी चे आमदार माननीय संतोष बांगर वसमत चे आमदार माननीय राजू भैया नवघरे , हिंगोली चे आमदार माननीय तानाजीराव मुटकुळे हिंगोली जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष माननीय श्री मनीष आखरे, हिंगोली जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती रूपालीताई पाटील, हिंगोली जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती फकीरा मुंडे, सभापती बाजीराव जुंबडे, सभापती सौ रत्नमाला चव्हाण, वसमत नगरपालिकेचे नगराध्यक्ष श्रीनिवास पोराजवार वसमत , पंचायत समितीच्या सभापती सौ ज्योतीताई धोसे, वसमत पंचायत समितीचे उपसभापती विजयरावजी नरवाडे ,इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत तरी जास्तीत जास्त वसमत तालुका व जिल्हा जिल्ह्यातील शाळांनी या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन हिंगोली जि ,प ,चे शिक्षणाधिकारी माध्यमिक श्री पावशे साहेब शिक्षणाधिकारी प्राथमिक श्री संदीप सोनटक्के डायट प्राचार्य कुटवाड , उपशिक्षणाधिकारी मनदोडे साहेब , वसमत पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी तानाजीराव भोसले ,लिटल किंग्ज इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक गोविंद दळवी यांनी केले आहे