डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेची शिक्षक आमदार मा.विक्रमजी काळे यांच्याकडे आग्रहाची मागणी !
औरंगाबाद
प्रतिनिधी,
डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या वतीने औरंगाबाद विभागाचे कर्तव्यदक्ष शिक्षक आमदार मा.विक्रमजी काळे साहेब यांना शिक्षकांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी निवेदन देऊन सविस्तर चर्चा करण्यात आली. औरंगाबाद जिल्हा परिषद शिक्षकांचे वेतन दरमहा वारंवार ऊशीरा होत असल्याने अनेक शिक्षक बंधू भगिनी त्यांचे गृहकर्ज व इतर कर्जाचे हप्ते वेळेवर भरु शकत नाही.त्यांना विनाकारण आर्थिक दंड सोसावा लागत आहे.
औरंगाबाद जिल्हा परिषद शिक्षकांचे वेतन सीएमपी प्रणालीने करण्यात यावे अशी आग्रहाची मागणी शिक्षक आमदार मा.विक्रमजी काळे यांच्याकडे करण्यात आली. सीएमपी प्रणालीने वेतन सुरू करण्यासाठी तात्काळ संबंधित सर्व अधिकारी यांना निर्देशीत करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले.
शिष्टमंडळात डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष एम.एम.खुटे,जिल्हा सचिव भास्कर गोपाळ, उपाध्यक्ष गोविंद गायकवाड, शहराध्यक्ष योगेश गायकवाड, अशोक आढाव उपस्थित होते.
शिक्षकांच्या खालील प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा करून निवेदन देण्यात आले.
- सन २००५ नंतरच्या सर्व शिक्षकांना जूनी पेन्शन योजना लागू करावी.
- आश्वासित प्रगती योजना १०-२०-३० शिक्षकांना लागु करावी.
- शिक्षकांचे वेतन सीएमपी प्रणालीने करण्यात यावे.
- DCPS धारकांचा अचूक सर्व हिशोब होईपर्यंत NPS खाते न उघडने बाबत.
- वस्ती शाळा शिक्षकांना D.Ed पास होण्यासाठी वाढीव मुदत मिळणे बाबत.
- कोवीड १९ या आजाराचा मेडिकल परिपूर्ती बिलात समावेश करणे बाबत.
- शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक प्रमोशन बाबत.