वसमत
प्रतिनिधी
वसमत येथील लिटल किंग्ज इंग्लिश स्कूल , आणि मुक्ताई कनिष्ठ महाविद्यालय चे संस्थापक आणि डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रिय शिक्षक परिषदेचे अध्यक्ष नामदेव दळवी यांना नुकतीच पीएच .डी ही पदवी प्रदान केली आहे
त्यांनी ” शहीद वीर भगत सिंग यांचे विचार व कार्य ; एक चिकित्सक अभ्यास ” या विषयावर विद्यापीठास लातूर येथील भगतसिंग महाविद्यालयायाचे प्राचार्य डॉ विठ्ठल मोरे आणि त्यांच्या मृत्यूनंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ . शुजा शाकिर यांच्या मार्गदर्शनात हा शोध प्रबंध विद्यापीठास दाखल केला होता
दि 2 नोव्हेंबर 2020 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ तुन ऑनलाईन मुलाखत संपन्न झाली
आतापर्यंत महाराष्ट्रात आणि एकदंरीत भारतात या विषयावर संशोधन झाले नव्हते
भगतसिंग एक क्रांतिकारक म्हणून या देशातील युवकांचे ते आजच्या परिस्थितीत एक आयडॉल होऊ शकतात आणि एक राजकिय विचारवन्त म्हणून त्याचे विचार भारतासाठी दिशादर्शक असे असेल आशा स्वरूपाचे त्यांचे हे संशोधन निश्चितच तरुणांसाठी मार्गदर्शक ठरेल .
नामदेव दळवी यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मानव्यविद्या शाखा प्र, अधिष्ठाता डॉ चेतना
सोनकांबळे ब ;हिस्थ परिक्षक डॉ विलास आघाव , अध्यक्ष राज्यशास्त्र अभ्यास मंडळ स्वा रा तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड , प्रोफेसर डॉ नवनाथ आघाव अध्यक्ष राज्यशास्त्र अभ्यासमंडल डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ , यांचे विशेष मार्गदर्शन लाभले
प्रा डॉ नामदेव दळवी यांचे डॉ सोनाजी पतंगे , डॉ नरसिंग पिंपरने , डॉ प्रताप पाटील , डॉ गजानन लोमटे , प्रा डॉ परमेश्वर मुंढे ,प्रा डॉ बिडवे , डॉ दीपाली अंभोरे , प्रा डॉ शिवराज शिंदे , डॉ पांडुरंग बर्वे , डॉ पंडित , सतीश जाधव वसमत प स चे गटशिक्षणाधिकारी तान्हाजीराव भोसले , मीना इंगोले लिटल किंग्ज ,मुक्ताई महाविद्यालयातील प्राध्यापक कर्मचारी डॉ पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे पदाधिकारी , मराठा सेवा संघ , संभाजी ब्रिगेड चे पदाधिकारी सर्व मित्रपरिवार , सामाजिक ,राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे
नामदेव दळवी यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची पीएच.डी
Leave a comment