वसमत प्रतिनीधी
वसमत येथील लिटल किंग्ज शाळेचा बालमहोत्सव मोठया उत्साहात संपन्न झाला.
वसमत पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी तान्हाजी भोसले यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी प्रमूख अतिथी म्हणून बार्शी येथील जिजाऊ सैनिकी शाळेचे संस्थापक संभाजी पाटील घाडगे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी वर्षाताई घाडगे, कदमज अकॅडमी पुण्याचे संचालक उदयराव कदम, लोह्याच्या सह्याद्री शिक्षण संकुलाचे संस्थापक सुदर्शनराव शिंदे, नांदेड जिल्हा मेस्टा चे अध्यक्ष शिवाजीराव ऊमाटे , शिक्षण विस्तार अधिकारी मोरे सर, नूतन शाळेचे केंद्रप्रमुख दिलीप पंडित, यु. टी. पवार सर, वसमत तालुका स्काऊट गाईड समन्वयक श्याम संगेवार, शिक्षक पालक संघाचे शाळा प्रतिनिधी विकास सवंडकर यांची उपस्थिती होती.
मान्यवरांचा हस्ते सावित्री जिजाऊ यांच्या पुतळ्याचे पूजन करून दीप प्रज्वलनाने सुरुवात करण्यात आली.
या सांस्कृतिक बाल महोत्सवात शाळेतील प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी ४५ समुह नृत्य सादर केली.
शाळेच्या वतीने प्राथमिक विभागातून दोन ज्यात आर्या लोखंडे हिला क्वीन ऑफ इयर तर मनीष काळे ह्याला किंग्ज ऑफ इयर २०२३. उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार तर माध्यमिक विभागातून दोन विद्यार्थ्यांना ज्यात प्रणव बोडेवार आणि हर्षदा मुरक्या ह्यांना उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
शाळेमधून दोन शिक्षकांना ज्यात राम ढोरे आणि संगीता वानखेडे यांना आदर्श शिक्षक पुरस्कारही मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लिटल किंग शाळेचे मुख्याध्यापक गोविंद दळवी आणि मुक्ताई विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक अलोक हिंगोली दोन्ही शाळेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
कोट…
दरवर्षी लिटल किंग शाळेचा बाल महोत्सव सांस्कृतिक महोत्सव म्हणून वसमत शहरात प्रसिद्ध असतो त्यामुळे हा महोत्सव बघण्यासाठी शाळेतील पालक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात याचा विचार करून शाळेने बाल महोत्सवाचे एक दिवस अगोदर वसमत शहर पोलिसांना बंदोबस्तासाठी निवेदनही दिले होते पण कुठलाही पोलीस बंदोबस्त पोलिसांनी शाळेच्या कार्यक्रमास दिला नाही त्यामुळे कार्यक्रमांमध्ये शहरातील टुकार मुलांनी दारू पिऊन परिसरात धिंगाणा घातला त्यामुळे शाळेचा बाल महोत्सव काही काळ मध्येच थांबला . पोलिसांना वारंवार शाळा व्यवस्थापनाने फोन करून सुद्धा कुठलाही पोलीस बंदोबस्त कार्यक्रम स्थळी आला नाही नंतर शाळा व्यवस्थापनाने सर्व विद्यार्थी शहर पोलीस स्टेशनला नेऊन राहिलेला बाल महोत्सव तिथेच संपवण्याचे धरणे धरले ,त्यामुळे शहरातील नागरिकांनी रात्री अकरा वाजता शहर पोलीस स्टेशनमध्ये गर्दी केली होती, पोलीस प्रशासनाकडे कुठलेही उत्तर नसल्याने शहरातील ज्येष्ठ नागरिकांनी मध्यस्थी करून प्रकरण निवळले.