वसमत
हिंगोली विशेष
प्रतिनिधी
कुरूंदा ता. वसमत परिसरातील ऐतिहासिक परंपरा व अद्वितीय भुमितीय स्थान लाभलेल्या टोकाईगडाला गोदावरी अर्बन बँकेच्या अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. राजश्रीताई हेमंत पाटील यांनी भेट दिली. याप्रसंगी सरपंच सौ. प्रीतीताई दळवी , डॉ. प्रभाकर दळवी , शिवसेना जिल्हा उपप्रमुख सुनिलभाऊ काळे , नगराध्यक्ष श्रीनिवास पोरजवार , वसमत तालुका प्रमुख बालाजीराव तांभाळे , शहर प्रमुख काशिनाथ भोसले , हिंगोली युवासेना जिल्हाप्रमुख तथा अध्यक्ष खादी ग्रामोद्योग बाजीराव सवंडकर , नगरसेवक धनंजय गोरे , नगरसेवक दिलिप भोसले , माजी सरपंच दत्तमरामजी इंगोले , माजी जि. प. सभापती रंगराव इंगोले , दत्ता नवले , प्रा. नामदेव दळवी , सौ. मिनाताई दळवी ,नगरसेवक धनंजय गोरे , वसमत विधानसभा जनसंपर्क अधिकारी राजा कदम , सह्याद्री देवराई कुरूंदाचे सर्व स्वयंसेवक तसेच ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
राजश्रीताईंच्या हस्ते वड , पिंपळ , करंज , कडूनिंब यासारखी बहुवर्ष्रीय , बहुगुणी झाडे लावण्यात आली. तसेच ताईंनी सह्याद्री देवराईच्या युवकांनी मियाॕकी पद्धतीने विकसीत केलेल्या दहा गुंठ्यावरील घनवनाची पाहणी केली. यात वेलवर्गीय , औषधी , घन , बहुवर्षीय अशा सुमारे तीन हजार झाडांची लागवड केलेली आहे. याच परिसरात छत्रपती शहाजीराजांनी भोसले यांनी बांधलेली बारव व पावसाळी छावणीच्या इतिहास कालखंडातील वैभवशाली परंपरा जोपासत ही सह्याद्री देवराई परिसरातील जैवविविधतेचे वैभव वाढवणारी आहे.
याप्रसंगी सरपंच सौ. प्रीतीताई दळवी व डॉ. प्रभाकर दळवी यांनी राजश्रीताई व मान्यवरांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत केले. टोकाई गडाचे गौरवशाली वैभव जोपासणाऱ्या सह्याद्री देवराई प्रकल्प व ग्रामस्थांच्या कार्यात सहभाग नोंदवून ताईंनी सर्वांना प्रोत्साहन दिले. याप्रसंगी ताईच्या पुढाकारातून गडाच्या परिसरात झाडे लावण्यासाठी खड्डे व चर खोदण्यासाठी हिंगोली जिल्हा युवासेना प्रमुख श्री. बाजीराव सवंडकर यांनी तीन दिवस स्वतःची जेसीबी सह्याद्री देवराई साठी देण्याचे अभिवचन दिले