प्रतिनिधी वसमत.
वसमत तालुक्यातील जवळा बु ग्रामपंचायतीच्या शासकीय निधीचा अपहार प्रकरनी ग्रामसेवक ज्ञानेश्वर मलवाड. व सरपंच सारिका गजानन डाढाळे व गजानन भिमराव डाढाळे यांच्यावर प्रथम वर्ग न्यायालय वसमत यांनी शासकीय निधीचा मोठ्या प्रमाणात अपहार केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करन्याचे नुकतेच आदेश देन्यात आले आहेत.
सविस्तर व्रत असे की सन 2017–18मधे गावातील विवीध विकास कामासाठी शासनाकडून लाखो रुपयाचा निधी जवळा बु ग्रामपंचायतला प्राप्त झाला होता. त्या निधी मध्ये विकास आराखड्यानुसार विवीध विकास कामासाठी मंजुरी मीळाली होती.परंतु विकासाची कामे न करता थेट बॅक अकॉउट वरचे 7.15.153.सात लाख पंधरा हजार एकशे त्रेपन रुपयाचा चौदावा वित्त आयोगाचा निधी व तंटामुक्त गाव योजनेतून मिळालेले 2.00000 दोन लाख रुपयाचे बक्षीस अशे एकुन नव लाख पंधरा हजार एकशे त्रेपन रुपयाचा पैशाची उचल करुन स्वताःच्या फायद्यासाठी वापरात आणले.या प्रकरनाची सखोल चौकशी करुन आरोपीवर कठोर कार्यवाही करन्यासाठी नॅशनल दलीत मुवमॅट फॉर जस्टीस वसमत या सामाजीक संघटनेचे चे तालुकाध्यक्ष भगवान जाधव. यांनी गटविकास आधीकारी प.स. वसमत .मुख्य कार्यकारी आधीकारी जि प हिंगोली. जिल्हाधिकारी हिंगोली यांना प्रत्यक्ष भेटुन योग्य त्या कार्यवाही ची मागणी केली .परंतु आरोपीना गटविकास आधीकारी प .स .वसमत यांनी पाठीशी घातले.त्यामुळे सामाजीक कार्यकरते भगवान जाधव यांनी वसमत न्यायालयातील जेष्ठ विधीतज्ञ अॅड.शेख .फारुख यांच्या मार्फत थेट सबळ पुराव्यानीशी न्यायालयात धाव घेऊन .प्ररकरनातील जेष्ठ विधीतज्ञ अॅड.शेख फारूख यांनी प्रकरनाची प्रभावीपणे बाजु मांडुन झालेल्या निधीचा अपहार न्यायालयाच्या निदर्शनास आणुन दिला .तेव्हा न्यायालयाने दि.24/2/2020रोजी आरोपी ग्रामसेवक ज्ञानेश्वर मलवाड. सरपंच सारिका गजानन डाढाळे. व गजानन भीमराव डाढाळे यांच्यावर कलम. 409.420.467.468.471,166167.34प्रमाने गुन्हे नोंद करन्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायालय वसमत यांनी दिले आहेत .त्यामुळे सर्व ग्रामस्थाना न्याय मिळाल्यामुळे ग्रामस्थांनी न्यायालयाचे अभार मानले आहे.
जवळा बु ग्रामपंचायतीच्या शासकीय निधीचा अपहार प्रकरनी अखेर न्यायालयाने दिले गुन्हे दाखल करन्याचे आदेश.
Leave a comment