तातडीने पंचनामे करून दिले मदतीचे आश्वासन
वसमत
प्रतिनिधी
वसमत तालुक्यातील कुरूंदा मागील दोन ते तीन दिवसांपासून जोरदार पाऊस पडत असल्याने गावालगत वाहणाऱ्या जलेश्वर नदीला आलेल्या पुरामुळे कुरुंदा गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले त्यावेळी ग्रामपंचायतचे कुठलाही नुतन प्रशासक, तलाठी, ग्रामसेवक, गावातील लोकप्रतिनिधी किंवा अपत्ती व्यवस्थापन समितीचा कुठलाही प्रशासनाचा माणूस त्या ठिकाणी पहिल्या दिवशी पोहोचलेला नव्हता असे पुरग्रस्थानकडून सांगण्यात येत होते .
सकाळी 6 वाजल्यापासून संभाजी ब्रिगेडचे कुरुंदयातील पदाधिकारी कार्यकर्ते यांनी त्या ठिकाणी जाऊन पूरग्रस्तांसाठी बचाव व मदत केली अनेक घरांत पाणी शिरले होते त्यामुळे अनेकांचे सकाळच्या जेवणाचे उपासमारीची परिस्थिती बघता कार्यकर्त्यांनी आपद्ग्रस्तांसाठी खिचडी वाटप केली . होती या अगोदरही ढगफुटीच्या वेळी महापूर आला होता त्यावेळी अनेक घरांचे नुकसान पडझड झालेले पंचनामे झाले तरी त्या लोकांना न्याय मिळाला नाही अशी कैफियत गांवकरी यांनी आमदार राजू नवघरे यांच्या कडे केली असल्याचे समजते
अशाच परिस्थितीत वसमत विधासभेचे आमदार राजू नवघरे यांनी तातडीने पुरपरिस्थितीची स्वतः जाऊन पाहणी केली , तातडीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून पुरग्रस्थाना न्याय देणार असल्याचा त्यांना धीर दिला
कुरुंदा गावलगतची जलेश्वर नदी खोलीकरण च्या माध्यमातून पुराचा प्रश्न कायम मिटु शकतो येणाऱ्या काळात नदीचे खोलीकरण करून देणार असल्याचा विश्वास त्यांनी गावकऱ्यांना दिला
साधारण जास्त पाऊस झाला की कुरुंदा गावास पुराचा वेढा पडतो आशा परिस्थितीत कायम काही तोडगा काढला येईल का याबाबतीत त्यांनी प्रशासकीय अधिकारी आणि गावकर्यांसोबत चर्चा केली यावेळी त्यांच्या सोबत
कुरुंदा येथे ढगफुटी पावसामुळे गावालगत असलेल्या नदीची पाणी गावात शिरल्याने झालेल्या नुकसानीची पाहणी व दलित वस्ती ,इदगा व ग्रामपंचायत कार्यालय येथे गावातील लोकांची चर्चा व पाहणी करताना आमदार राजू भैया नवघरे, तहसीलदार सचिन जयस्वाल कुरूंदा पोलिस स्टेशनचे पी आय सुनील गोपीनवार ,महसूल मंडळ अधिकारी अंभोरे साहेब ,तलाठी गरुड साहेब, ग्रामसेवक कोकाटे साहेब, कृषी सहाय्यक गुडालोड ,कृषी मंडळ अधिकारी गरुड साहेब ,मुंजाजी दळवी ,जिजा पाटील हरणे अंबादास जाधव व इतर पदाधिकारी उपस्थित होते