वसमतला जिजाऊ ब्रिगेडची मागणी
वसमत
प्रतिनिधी
वसमत तालुक्यातील मराठा सेवा संघाच्या जिजाऊ ब्रिगेड या वसमत तालुका कार्यकारणीच्या वतीने मराठा समाजाचा सरसकट समावेश ओबीसी आरक्षण गटामध्ये करण्यात यावा आशा मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी कार्यालय वसमत मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आले
मराठा समाजाचा न्यायमूर्ती एम जी गायकवाड आयोगाने सर्व तपासणी करून आपला अहवाल सादर केला आहे त्यानुसार मराठा समाज सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक क्षेत्रात मागासलेला असल्याचे निदर्शनास आले आहे.
व मराठा समाज राज्यघटना कलम 340 नुसार पात्र ठरला आहे. म्हणून न्यायमूर्ती गायकवाड आयोगाची शिफारस मान्य करून मराठा समाजाला ओबीसी आरक्षण वर्गात आरक्षण द्यावे अशी मागणी, उपजिल्हाधिकारी, वसमत यांच्यामार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व अध्यक्ष, मराठा समन्वय समिती. यांना जिजाऊ ब्रिगेड, वसमत कार्यकारिणीच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आले आहे. या निवेदनावर तालुकाध्यक्ष शिवमती नंदिनी भालेराव यांची सही असुन त्यांच्यासह सीमाताई भिंगोले, संगीता देशमुख, मंदा कल्याणकर राधा बेले, पूजा चव्हाण, मीना दळवी, अपर्णा तनपुरे, कल्पना मिरकुटे व व इतर जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी निवेदन दिले.