हिंगोली
प्रतिनिधी
संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील महागावकर यांच्या नेतृत्वाखाली हिंगोली जिल्ह्यातील संभाजी ब्रिगेड च्या विविध तालुक्यातील पदाधिकारी यांच्या निवडी सुरू असून नुकतीच वसमत येथे तालुक्यातील पदाधिकारी यांच्या नुकत्याच संपन्न झाल्या असून त्या खालीलप्रमाणे आहेत
संभाजी ब्रिगेड वसमत विधासभा अध्यक्ष पदी अलोक इंगोले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली, तसेच विधानसभा उपाध्यक्ष पदी गजानन दळवी,सचिव पदी प्रमोद कदम,कार्याध्यक्ष पदी मदन चव्हाण.
वसमत तालुका अध्यक्ष पदी दक्षिण तालुका अध्यक्ष पदी ज्ञानेश्वर मखाने तर उत्तर तालुका अध्यक्ष पदी विजय डाढाळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली, सोबतच तालुका प्रवक्ते पदी गजानन पडोळे,तालुका प्रवक्ते पदी विठ्ठलराव शिंदे तसेच तालुका उपाध्यक्ष पदी मारोती कराळे, प्रसिद्धी प्रमुख पदी अंकुश व्यवहारे व केशव वाळके यांची निवड केली.वसमत शहर उपध्यक्ष पदी कृष्णा जाधव,वसमत संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडी तालुका अध्यक्ष पदी भगवान कदम, उपाध्यक्ष पदी गोविंद शिंदे,सचिव पदी प्रशांत भोसले,तसेच शहर विद्यार्थी आघाडी अध्यक्ष पदी सुरज आडकीने,गणेश गुंडाले शहर सोशल मीडिया प्रमुख पदी निवड करण्यात आली.तसेच व्यापारी आघाडी वसमत शहर अध्यक्ष पदी विष्णू वसमतकर,आंबा सर्कल प्रमुख पदी विकास भोसले,आंबा गण प्रमुख पदी आदिनाथ भोसले,कोर्ट गण प्रमुख पदी राजू व्यवहारे,आसेगाव सर्कल प्रमुख पदी कमालकिशोर नरवाडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.यावेळी सतीश पाटील महागावकर यांचे हस्ते सर्वाना नियुक्ती पत्र देण्यात आले.प्रसंगी सुरेश इंगोले,नारायण खराटे,मुरलीधर बागल सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.