वसमत
शहर प्रतिनिधी
मागील आठ दिवसापासून सततचा पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे वसमत शहराला पाणीपुरवठा करणारी यंत्रणा प्रभावीत झाली आहे
त्यामुळे मागिल आठवडा भरापासून वसमत शहराचा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी यंत्रणा ठप्प झाली आहे
नगर पालिकेतील पाणी पुरवठा कर्मचारी चाऊन यांनी दिलेल्या माहितीवरून
मागील काही दिवसाच्या वादळी वाऱ्यामुळे आणी
दि 19.9.2020 रोजी दुपारी वाऱ्यासह पाउस पडल्याने वसमत पाणी पुरवठा योजने च्या एक्सप्रेस फिडर विद्धूत वाहिनी चे विद्धूत पोल वसमत रेल्वे ब्रिज पावरलुम्ं ते महादेव मंदीर बालाजी जिनिग पर्यंत विद्युत खांब पडल्याने पाणी पुरवठा खंडीत विस्कळित झाला आहे .
तसेच जिन्तुर 132 KV ते रुपर 33 KV ते सिद्देश्वेर धरण पंप हाऊस चा विद्धूत पुरवठा देखील वारं वारं खंडीत होत असल्याने मागिल एक आठवड्यापासून वसमत शहरा चा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे
लाईट जोडण्याचे काम युद्धपातळीवर सुरु करुन लवकरात लवकर शहरातील पाणीपुरवठा सुरू होईल तरी जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन नगर पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे
वादळी वाऱ्यासह जास्तीच्या पावसाने वसमतचा पाणीपुरवठा विस्कळीत
Leave a comment