संभाजी ब्रिगेड ची जिल्हाधिकाऱ्यामार्फत पंतप्रधानाकडे मागणी
हिंगोली
प्रतिनिधी
14 सप्टेंबर 2020 रोजी वाणिज्य मंत्रालय भारत सरकार द्वारा सूचना क्रमांक 31/2015 - 20 (Amendment in export policy of onions) काढण्यात आली सदरील अधिसूचनेची मध्ये तात्काळ कांदा निर्यात बंदी करण्यात यावी ही जाचक सूचना देण्यात आली या अनुषंगाने दिनांक 14 सप्टेंबर 2020 हा सबंध भारतातील कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी काळा दिवस ठरला आहे. ठासळलेली अर्थव्यवस्था, करोणा महामारी, नेहमीचा दुष्काळ, अतिवृष्टी, नापिकी, कर्जबाजारीपणा, बोगस बियाणे, जीएसटी, नोटाबंदी इत्यादी संकटांनी शेतकरी त्रासलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह देशातील शेतकरी आत्महत्या करीत आहेत. भारतामध्ये शेतकरी कष्ट करून उत्पन्न घेतात. आज कसातरी कांद्याला चांगला भाव मिळत आहे परंतु योग्य भाव शेतकऱ्यांना मिळत असताना शासनाच्या ह्या अन्यायकारक निर्णय यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे.
शेतकर्याचे मरण हेच सरकारचं धोरण हे कांद्याची निर्यातबंदी करून सरकारने सिद्ध केलं आहे. हे सरकार शेतकऱ्यांच्या जीवावर उठले आहे. त्याचा संभाजी ब्रिगेड जाहीर निषेध करीत आहे.
तरी माननीय पंतप्रधान मंत्री महोदययांना विनंती आहे की कांदा निर्यात तात्काळ चालू करा अन्यथा संभाजी ब्रिगेड भारत सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडेल तसेच भारतातील शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही त्यावेळेस कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी आपली राहील असा इशाराही देण्यात आला. यावेळी उपस्थित संभाजी ब्रिगेडचे राज्य अध्यक्ष मनोज दादा आखरे, हिंगोली जिल्हाध्यक्ष सतीश पाटील महागावकर, आलोक इंगोले, नामदेव कदम, नारायण खराटे, नितीन भोसले, महेश राखोंडे, गजानन हाके, बजरंग ढवळे, सचिन शिंदे आदी उपस्थित होते