हिंगोली
प्रतिनिधी
वसमत तालुक्यातील कुरूंदा येथे आज सकाळी तीन पासुन सुमारास जोरदार पाऊस चालू होता जलेश्वर नदीला आलेल्या पुरामुळे कुरुंदा गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले त्यावेळी ग्रामपंचायतचे कुठलाही नुतन प्रशासक, तलाठी, ग्रामसेवक, गावातील लोकप्रतिनिधी किंवा अपत्ती व्यवस्थापन समितीचा कुठलाही प्रशासनाचा माणूस त्या ठिकाणी पोहोचलेला नाही हे केवळ मत मागण्यासाठी या गरीब जनतेच्या दारापुढे पाया पडण्यासाठी येतात यावेळी माणुसकीची जाण असलेली महाराष्ट्रातील वैचारिक संघटन संभाजी ब्रिगेड सकाळी सहा वाजल्यापासून संभाजी ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी त्या ठिकाणी जाऊन पूरग्रस्तांसाठी बचाव व मदत केली अनेक घरांत पाणी शिरले होते त्यामुळे अनेकांचे सकाळच्या जेवणाचे उपासमारीची परिस्थिती बघता संभाजी ब्रिगेड च्या माध्यमातून घरांची झालेली पडझड पाहणी आपद्ग्रस्तांसाठी संभाजी ब्रिगेडने शिजविली खिचडी … लहान मुले भुकेने व्याकूळ लोकांसाठी एक वेळच्या जेवणाची सोय संभाजी ब्रिगेडच्या तर्फे करण्यात आली या अगोदरही ढगफुटीच्या वेळी महापूर आला होता त्यावेळी अनेक घरांचे नुकसान पडझड झालेले पंचनामे झाले तरी त्या लोकांना न्याय मिळाला नाही किंवा कुठलीही प्रशासकीय मदत मिळाली नाही वारंवार पाठपुरावा करून सुद्धा शासनाने याकडे दुर्लक्ष केलेले आहे हिंगोली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती ही केवळ नावापुरतीच असून यांनी आजपर्यंत कुठल्याही जिल्ह्यातील महापूर आला किंवा कुठल्याही आपत्तीग्रस्त लोकांसाठी मदत केली नाही या सर्व लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये संभाजी ब्रिगेड अग्रेसर असेल आज झालेल्या पूरग्रस्तांच्या मदतीला धावून निर्माण झाला आहे यावेळी संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष सुरेश इंगोले संभाजी ब्रिगेडचे मार्गदर्शक आलोक इंगोले, चक्रधर दळवी, जावेद शेख, मारुती मुळे, असे असंख्य कार्यकर्ते याठिकाणी उपस्थित होते.
कुरुंदा येथे पूरग्रस्तांच्या मदतीला संभाजी ब्रिगेड
Leave a comment