लिटल किंग्जच्या बालमहोत्सवाला सुरुवात
वसमत
प्रतिनिधी,
वसमत शहरातील लीटल किंग्ज इंग्लिश स्कूलच्या १४ व्या वार्षिक बालमहोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली, महाराष्ट्राच्या विविध लोककला जसे भारुड, गोंधळ, पोवाडा ,नाटक , कव्वाली, लोकगीत , लोकनाट्य , आदिवासी नृत्य , आणि कॉमेडी या विविध कला प्रकारावर लिटल किंग्ज इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत सुंदर व देखणी नृत्य सादर करीत उपस्थित पालकांची मने जिंकली , विशेष म्हणजे या बालकलावंतांसाठी या शाळेत एक मोठे रंगमचं तयार करण्यात आले असून नवतंत्रज्ञानाचा वापर करून या बालमहोत्सवाला एक हायटेक पणा दिसून आला
या बालमहोत्सवात राष्ट्र भक्तीपर गीताने तर उपस्थित पालकांनी घोषणांनी राष्ट्रभक्तीचा जयजयकार केला ,
या बालमहोत्सवाचे उदघाटन वसमत वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजेंद्र दळवी अध्यक्ष म्हणून वसमत पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी तान्हाजीराव भोसले , संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील जाधव महागावकर वसमत शिक्षण विभागातील सर्व केंद्रप्रमुख जटाशंकर मुव्हीजचे संचालक बाळासाहेब गावंडे, शाळेचे मुख्याध्यापक गोविंद दळवी, संचालिका मीना इंगोले शाळेतील पालक विध्यार्थी मोठ्यासंख्येने उपस्थित होते
या प्रसंगी याप्रसंगी अडवोकेट राजेंद्र दळवी सतीश पाटील जाधव महागावकर व गटशिक्षणाधिकारी तानाजीराव भोसले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले
कार्यक्रमाचे संचालन शाळेचे मराठी विभाग प्रमुख सइम पिराजी यांनी केले तर समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला