जिल्हास्तरीय विज्ञान महोत्सवाची सांगता
वसमत राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर आणि शिक्षण विभाग जिल्हा परिषद हिंगोली व लीटल किंग्ज इंग्लिश स्कूल वसमत यांच्या संयुक्त विद्यमाने वसमत येथील लीटल किंग्ज इंग्लिश स्कूलमध्ये जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन 28 , 29 आणि 30 जानेवारी 2020 रोजी करण्यात आले होते या विज्ञान प्रदर्शनात जिल्ह्यातील पाचही तालुक्यातून विविध विज्ञानाचे प्रयोग विद्यार्थ्यांनी प्राथमिक आणि माध्यमिक गटातून सादर केले
तर शिक्षकांमधून सुद्धा प्राथमिक व माध्यमिक स्तरातून सहा प्रयोग या विज्ञान प्रदर्शनात मांडण्यात आले होते
समारोपीय बक्षीस वितरण सोहळा 30 जानेवारी संपन्न झाला यावेळी जि प शिक्षण विभाग माध्यमिक चे उपशिक्षणाधिकारी मलदोडे साहेब तर प्रमुख पाहुणे गटशिक्षणाधिकारी तान्हाजी भोसले विविध केंद्रप्रमुख, श्री सिद्धेश्वर विद्यालय वसमतचे मुख्याध्यापक बालमखाने सर, अहिल्याबाई होळकर विद्यालयाचे जुउळकर आणि लिटल किंग्ज शाळेचे मुख्याध्यापक गोविंद दळवी हे उपस्थित होते
या प्रदर्शनात प्राथमिक गटामधून प्रथम पारितोषिक स्वामी विवेकानंद विद्यालय दिग्रस कराळे या शाळेच्या ” वीजचोरी रोखण्यासाठी सादर केलेल्या प्रकल्पाला मिळाली तर द्वितीय पारितोषिक सह्याद्री पब्लिक स्कूल वसमत या शाळेचा ” बर्फी द रोबोट ” या प्रयोगाला मिळाले तर तृतीय पुरस्कार अनुसया विद्यामंदिर हिंगोली च्या ” हेल्दी सोया डायट” या प्रयोगाला मिळाले तर माध्यमिक गटामधून प्रथम येण्याचा बहुमान जिल्हा परिषद प्रशाला वसमतच्या ” स्मार्ट ब्लाइंड स्टीक विथ कॅप ” या प्रयोगाला मिळाले तर द्वितीय बक्षीस महाराष्ट्र विद्यालय माळहिवरा या विद्यालयाच्या ” मळणी यंत्र ” या विज्ञान प्रयोगाला मिळाले तर तृतीय पारितोषिक भानेश्वर विद्यालय सेनगाव या शाळेच्या ” खुडणी यंत्र ” या प्रयोगाला मिळाले तर या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक विभाग शिक्षकांमधून श्री बालाजी आसोले जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा टेंभुर्णी यांच्या प्रयोगाला प्रथम तर माध्यमिक विभागातून रतन भोपाळे शिवाजी माध्यमिक विद्यालय हिंगोली यांच्या प्रयोगाला प्रथम पारितोषिक मिळाले या विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी वीज चोरी पकडणारे यंत्र , सायलेन्सर , शाश्वत कृषी पद्धती , जैविक कीटकनाशके , शेतकरी तोफ , स्मार्ट सिटी प्लान , दिवसाचे खगोलशास्त्र , द बर्निंग ट्रेन रोबोटिक्स , सोलार मळणी यंत्र , स्वच्छतेसाठी आधुनिक रोबोट इत्यादी नवनवीन विषयावर आपले नाविन्यपूर्ण प्रयोग सादर केले होते या विज्ञान प्रदर्शनातील प्रयोगांचे परीक्षण करण्यासाठी परीक्षक म्हणून हिंगोली येथील विज्ञान शिक्षक नितीन मोरे सर, हू बहिर्जी स्मारक महाविद्यालयातील प्रा डॉ सुधाकर भालेराव, प्रा डॉ व्ही टी नरवाडे सर यांनी काम पाहिले
वसमतच्या लीटल किंग्ज शाळेने अत्यंत शिस्तीत हे विज्ञान प्रदर्शन आयोजित केले होते हे विशेष यात विविध समित्यांनी अत्यंत नियोजन पूर्वक हे प्रदर्शन यशस्वी केले या सर्वांना जि प हिंगोली येथील विज्ञान पर्यवेक्षक विनोद करंडे यांनी मार्गदर्शन केले ,