ब्रिटीश कौन्सिल एक्शन रिसर्च मीटिंग स्कीम अंतर्गत शिक्षकांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण
महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोशीयशन ( मेस्टा ) लिट्ल किंग्ज़ इंग्लिश स्कूलचा पुढाकार
वसमत
प्रतिनिधी
शिक्षण ही मानवी जीवनाला प्रगल्भ बनून जीवनात अमुलाग्र बदल करणारी प्रक्रिया आहे , त्यामुळे यशस्वी शिक्षक्षकच यशस्वी अध्यापन करू शकतो
हाच मुद्दा घेऊन वसमत येथे लिटल किंग्ज इंग्लिश स्कूल, ब्रिटीश कौन्सिल आणि महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ८ मार्च २०२० रोजी सकाळी १० ते ४ वाजेपर्यंत जागतिक महिला दिनी वसमत येथील लिटल किंग्स इंग्लिश स्कूलच्या मुक्ताई सभागृहात एक दिवशीय शिक्षक प्रशिक्षण आणि यशस्वी अध्यापनासाठी संशोधन या विषयावरती कार्यशाळा संपन्न होणार आहे ,
मार्गदर्शक म्हणून ब्रिटिश कौन्सिलचे हरिश पाटोदकर , हिंगोली डायटचे माजी प्राचार्य प्राध्यापक गणेश शिंदे , डॉक्टर सुभाष बोंडे डॉक्टर संतोष कल्याणकर इत्यादी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत
या एक दिवसीय कार्यशाळेत काय शिकायला मिळेल ?
—-–——————
शिक्षकांनी यशस्वी अध्यापन कसे करावे ?
संशोधन का महत्वाचे ?
कठीण प्रसंगात विद्यार्थ्यांना कसे शिकवावे ?
तुम्हाला संशोधनासाठी कसे प्रेरित केले जाईल ?
एक प्रभावी अध्यापक बनविले जाईल
तुमच्यात काय बदल करावा लागेल ?
आपले प्रश्न विचारू शकता आणि विविध माहिती द्वारे आपले संशोधन आपण कसे करावे याचे प्रशिक्षण मिळणार आहे
म्हणून एक आदर्श आणि खरा शिक्षक होण्यासाठी वसमत शहर व तालुक्यातील शिक्षकांनी या प्रशिक्षण कार्यशाळेत उपस्थित रहावे
प्रवेश विनामूल्य आहे
या प्रशिक्षणात कोण सहभागी होऊ शकेल शिक्षक पालक जेकी शिक्षणात संशोधन आणि यशस्वी अध्यापन कसे करता येईल व आदर्श शिक्षक आदर्श पालक
सहभागी होऊ शकाल तेव्हा या एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात जास्तीत जास्त शिक्षक-पालक यांनी सहभाग घेऊन सहकार्य करावे असे महाराष्ट्र इंग्रजी शाळा संस्थाचालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुभाष बोंडे विभागीय सचिव डॉक्टर संतोष कल्याणकर प्रा नामदेव दळवी जिल्हा सचिव तसेच
इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक गोविंद दळवी यांनी केले आहे,