मेस्टा प्रदेश अध्यक्ष प्रा. डॉ. नामदेव दळवी.
वसमत
प्रतिनिधी
देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून आज पर्यंत आमचा मताचा अधिकारच आमच्या पर्यंत पोहोचु दिला गेला नाही. याला लोकशाही कशी म्हणावी ?
महाराष्ट्र इंग्रजी शाळा संस्थाचालक संघटना अर्थात ( मेस्टाने ) विधानपरिषद निवडणुकीत भाग घेण्याचा निर्णय घेतला. आणि इंग्रजी शाळा संस्थाचालक खडबडून जागा झाला त्याच बरोबर कधी नव्हे ते मतदार नोंदणीचे फॅार्म राज्यातल्या प्रत्येक इंग्रजी शाळेपर्यंत पोहोचले .
जसेकाही याच वर्षी इंग्रजी शाळेतील शिक्षकांना मताचा अधिकार मिळाला.
इंग्रजी शाळेतील शिक्षकांना मतदानापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र
परंतु मित्रांनो आज पर्यंत ज्यांनी आपणांस मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवले त्यांनीच पुन्हा एक षडयंत्र रचले. राज्यातल्या विशेष करून मराठवाड्यातल्या सर्व इंग्रजी शाळांवर शिक्षक मतदार नोंदणी फॅार्म द्यायचे ते भरून घ्यायचे परंतु जे मतदान त्यांच्या विरोधात जाईल असे वाटले की त्यांचे भरून घेतलेले फॅार्म निवडणुक अधिकाऱ्यांपर्यंत न पोहचवता कचरा कुंडीत टाकुन द्यायचे म्हणजे मतदार यादीत नावच येऊ द्यायचे नाही. विरोधकांना मतदान करणारे शिल्लकच नाही ठेवायचे. असे नियोजन प्रस्तापित करताना दिसत आहेत.
म्हणजेच आज पर्यंत मताचा अधिकारच कळु दिला नाही आणि आता तो कळालाच तर त्याचा अधिकारच हिसकाऊन घ्यायचा. अशाप्रकारे लोकशाहीची हत्या करणाऱ्यांना निवडुन येतांना आपणांस बघायचा आहे का ?
नसेल तर स्वत:च जागे व्हा मेस्टाचे फॅार्म भरून द्या कोणी नाही आले तर आपापल्या शाळेच्या शिक्षकांचे मतदान स्वत:च नोंदवून घ्या तर आणि तरच चमत्कार होऊ शकतो.
म्हणून जास्तीत जास्त इंग्रजी शाळा संस्थांच्या लोकांनी आपल्या शाळेतील शिक्षकांचे मतदार यादीत नाव कसे याचा प्रयत्न करावा आणि प्रस्थापित व्यवस्थेला शह देण्यासाठी तयार राहावे असे आव्हान महाराष्ट्र इंग्रजी शाळा संस्था चालक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजयराव
तायडे पाटील महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. नामदेव दळवी , राज्य संघटक प्रा सुदर्शन शिंदे,हिंगोली जिल्हा सचिव बालाजी देवकर, यांनी केले आहे.