मातृतीर्थ गडाबद्दल विद्यार्थ्यांनी जाणून घेतली माहिती .
वसमत
प्रतिनिधी
वसमत शहरातील लिट्ल किंग्ज इंग्लिश स्कूल या शाळेने नुकतीच सयाजीराव शिंदे यांच्या स्वप्नातील आणि वसमत तालुक्यातील मातृतीर्थ टोकाई गडावर शेकडो तरुण वृक्षप्रेमी मित्रांनी फुलविलेल्या घनवन प्रकल्पाला शाळेच्या दोनशे विद्यार्थ्यांनी भेट दिली. या मात्र तीर्थ टोकाई गडावर सयाजीराव शिंदे मित्र परिवाराच्या वतीने
सह्याद्री देवराई प्रकल्प साकारतोय याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती व्हावी , निसर्गाबद्दल जानू जागृती व्हावी आणि विद्यार्थ्यांची असलेले निसर्गाची नाते समजावे आणि त्यांची कर्तव्य त्यांना कळावीत हा एकमेव हेतू घेऊन ही शैक्षणिक सहल शाळेच्या वतीने आयोजित करण्यात आली होती.
या प्रकल्पाबद्दल लिटल किंग शाळेतील इंग्रजी विषयाचे शिक्षक विजय इंगोले सर यांनी प्रकल्प स्थळी विद्यार्थ्यांना या प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली.
एकाच जागेवर घनदाट अशा वृक्षाने केलेली दाटी आणि त्यातून निर्माण होणारा ऑक्सिजन आज किती महत्त्वाचा आहे याबद्दल विद्यार्थ्यांनी कुतूहलाने ही माहिती जाणून घेतली.
टोकाई गडावरील लावलेली पंधराहजार झाडे आज किती हरियाली निर्माण करू शकतात हे शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष डोळ्यांनी अनुभवली सोबत, बेलवण प्रकल्प फुलपाखरू उद्यान आणि बरच काही विद्यार्थ्यांनी या गडावर अनुभवले.
या नंतर तालु्यातील टोकाई सहकारी साखर कारखाना विद्यार्थ्यानी पहिला . तेथील उपलब्ध कर्मचाऱ्यांनी साखर कारखान्याच्या बद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली.
त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांना प्रा. कृष्णा बागल यांनी निर्माण केलेल्या श्री गणेश मिलिटरी फाउंडेशन या प्रकल्पाची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली तिथेच विद्यार्थ्यांनी वनभोजनाचा आस्वाद घेतला.
अत्यंत शिस्तीत ही शैक्षणिक सहल पार पाडण्यासाठी शाळेतील शिक्षक गोविन्द दळवी, विजय इंगोले, शितल इंगोले, सत्यभामा चौरे, वनराज
मुदणर, राम ढोरे, सिद्धार्थ खंदारे, रवी गावंडे, सुन्दर अंभोरे, मदत केली.