लिट्ल किंग्ज आणि मुक्ताई विद्यालय प्रथम पालक सभा संपन्न.
वसमत शहरातील लिटल किंग्ज आणि मुक्ताई विद्यालय हे जगातील विविध शिक्षण पद्धतीचा अवलंब करून विद्यार्थ्यांच्या जीवनात कामी येणारे शिक्षण देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करून आधुनिक शिक्षण हब उभा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल तुम्हा पालकांच्या सहकार्याने नक्कीच उभा करेल असे मत लिटल किंग्ज इंग्लिश स्कूलचे आणि मुक्ताई विद्यालय वसमत चे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.नामदेव दळवी यांनी शाळेच्या पालक प्रथम पालक सभेमध्ये सर्व पालकांचे उपस्थितीत व्यक्त केले.
Io
शाळेची प्रथम पालक सभा शाळेच्या ज्ञानंगण परिसरामध्ये शेकडो पालकांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली .सभेचे अध्यक्ष स्थानी शिक्षक पालक संघाचे प्रतिनिधी , महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक शाम रावले, विकास सवंडकर महिला पालक प्रतिनिधी कांचन कांबळे, शाळेचे मुख्याध्यापक गोविंद दळवी , आलोक इंगोले, संस्थापक प्रा .डॉ. नामदेव दळवी, संचालिका मीना इंगोले ,शिक्षक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी संगीत विभागाचे प्रमुख सिद्धार्थ खंदारे यांनी विद्यार्थ्यांसोबत स्वागत गीत
गाऊन उपस्थित पालकांचे स्वागत केले.
तर सभेची सुरूवात राष्ट्रमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवराय यांच्या पुतळ्याचे पूजन करून करण्यात आली.
पुढे बोलताना नामदेव दळवी म्हणाले की ,पालक केवळ विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग आणि डॉक्टर करण्याचे स्वप्न बाळगून त्यांना केवळ रेस चा घोडा बनवून त्यांच्याकडून नाहक अपेक्षा करत आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनावर प्रचंड मोठ्या प्रमाणात मानसिक ताण येतो आहे, मागील आठवडाभरात राज्यात आठ ते दहा विद्यार्थ्यांचा वर्गातच हार्ट अटॅकने मृत्यू झाला आहे . हा पेच शाळा शिक्षक पालक यांनी सोडवला पाहिजे त्यासाठी आमची शाळा प्रयत्न करत आहे. केवळ डॉक्टर आणि इंजिनियर हेच क्षेत्र आपल्यासमोर नाही तर हजारो क्षेत्रामध्ये आजचे विद्यार्थी स्वतःचे करिअर करू शकतात हे चांद्रयान तीनच्या निमित्याने भारताने जगाला दाखउन दिले आहे. त्यामुळेच शाळेतच सर्व विषयाच्या शिकवण्या आणि कोचिंग पूर्ण करण्याच्या निमित्ताने लिटल किंग ही शाळा आता सात तास करण्यात आली आहे.
यामध्ये पहिली ते पाचवी पर्यंत विविध बेसिक स्पर्धा परीक्षा आणि सहावी ते दहावीपर्यंत नीट , आयआय टी .फाउंडेशन आणि जगभरातील विविध स्पर्धा परीक्षा याचे सखोल ज्ञान शाळा विद्यार्थ्यांना शालेय वेळेमध्येच देणार आहे.
त्यामुळे पालकांचा आर्थिक बोजा तर कमी होईल पण विद्यार्थ्यांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा वेळही खर्ची जाणार नाही त्यांना खेळायला ही वेळ मिळेल त्यामुळे विद्यार्थी तंदुरुस्त राहतील , शेवटी शिक्षणाबरोबर संस्कारही महत्त्वाचे आहेत ,कारण सकाळी सहा ते रात्री अकरा पर्यंत विद्यार्थ्यांना केवळ गुंतवून ठेवण्याचे काम अनेक कोचिंग क्लासेस आणि पालकांच्या मदतीने होत आहे हे अत्यंत चुकीचे आहे. शाळेने स्वतःची स्वतंत्र विज्ञान प्रयोगशाळा आणि दहा ते बारा हजार पुस्तकाचे वातानुकूलित ग्रंथालय उभारले आहे. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.
यावेळी बोलताना पालक शिक्षक संघाचे प्रतिनिधी शामरावळे सर म्हणाले की शाळेने सुरू केलेला हा उपक्रम निश्चितच वाखाणण्याजोगा आहे पण पालकांनी आपल्या मुलांना अभ्यासासोबत खेळू पण दिले पाहिजे संस्कार आणि संस्कृती याची जतन पण केले पाहिजे देशाला भविष्यात शास्त्रज्ञांची आवश्यकता आहे त्यासाठी शाळेने काही प्रयत्न केले पाहिजेत, त्यासाठी शाळेचे संगणक आणि विज्ञान लॅब शाळेने उभी केली पाहिजे यासाठी पालक म्हणून आम्ही मदत करू असे मत व्यक्त केले तर याप्रसंगी पालक प्रतिनिधी विकास
सवंडकर म्हणाले की विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले गुण शाळा आणि शिक्षकयांनी उजागर करून ते जोपासले पाहिजे ती पालकांची पण जबाबदारी आहे .
शेवटी शिक्षण तर पूर्ण झालेच पाहिजे पण विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार करून शाळा शिक्षक आणि पालक यांनी एकत्र येऊन हे काम केले पाहिजे. शाळेमध्ये विविध गेस्ट लेक्चरर पण शाळेने घ्यावेत त्यासाठी शाळेला आम्ही मदत करू , शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात ते काम गेल्या अनेक वर्षापासून वसमत शहरातील प्रयोगशील शाळा म्हणून लिटल किंग्ज शाळा करत असल्याबद्दल मला अभिमान आहे. यावेळी मागील दोन महिन्यात असून शाळेत झालेल्या अभ्यासक्रमाच्या विविध रेकॉर्ड फाईल पालकांना वाटप करण्यात आल्या. यावेळी पालकांनी अनेक सूचना या सभेमध्ये शाळेत मांडल्या.
पालक सभेचे सूत्रसंचालन शाळेतील हिंदी विषयाच्या शिक्षिका निता अडकिने यांनी तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक गोविंद दळवी यांनी केले.