नागपंचमी निमीत्त सर्पमित्र श्रीकांत तांबोळी यांनी दिली विद्यार्थ्यांना विविध सापाची माहिती.
वसमत
प्रतिनिधी,
वसमत शहरातील लिट्ल कींग्ज इंग्लिश स्कूल आणि मुक्ताई विद्यालय या शाळेतील विद्यार्थ्यासाठी खास शाळेने नागपंचमी सणाचे वैज्ञानिक आणि पौराणिक महत्त्व या विषयावर शाळेमध्ये प्रत्यक्ष कार्यशाळा घेऊन विद्यार्थ्यांना भारतीय सण प्राचीन परंपरा आणि त्यामागील वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावर मार्गदर्शन केले.
साप म्हटलं की मुलांच्या मनात पहिली भावना येते ती भीतीची ती कमी व्हावी उलट सापाविषयी शास्त्रीय माहिती मुलांना मिळावी म्हणून नागपंचमीच्या दिवशी मुलांना सापाविषयीची माहिती देण्यात आली.
सकाळच्या सत्रात शाळेतील शिक्षक राम ढोरे यांनी नागपंचमी सण आणि शेतकऱ्यांसाठी या सणाचे वैज्ञानिक महत्व या विषयावर प्रार्थनेच्या सत्रात विद्यार्थ्यांना माहिती दिली .
तर दुसऱ्या सत्रात मध्यंतरानंतर प्रत्यक्ष नागपंचमी सण आणि सर्प विज्ञान या विषयावर साप हा शेतकऱ्यांचा मित्र कसा आहे याबद्दल वसमत शहरातील प्रसिद्ध सर्पमित्र श्रीकांत तांबोळी यांनी विविध साप ज्यात विषारी अन् बिन विषारी या सापाबद्दल माहिती दिली.
या वेळी विद्यार्थ्यांना सर्पमित्रांनी प्रत्यक्ष साप हाताळायला दिल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर मनमुराद आनंद दिसत होता.
घरात साप निघाल्यास काय करावे , साप विंचू चावल्यावर प्रथमोपचार कसे करावे , साप चावल्यानंतर मांत्रिकाकडे जाण्यापेक्षा लवकरात लवकर दवाखान्यात कसे जावे याबद्दलही प्रशिक्षण सर्पमित्रांनी विद्यार्थ्यांना दिले.
यावेळी दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक , सामाजिक कार्यकर्ते सम्राट गायकवाड, सर्पमित्र वैजवाडे प्रज्वल, ओंकार कल्याणकर ,सुमित धोंडे आणि विद्यार्थी उपस्थित होते.