वसमत
प्रतिनिधी
वसमत शहरातील ऐतिहासिक क्षण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य १४ फुटी पुतळ्याचे शहरात सकाळी 11 वा आगमन झाले ,
वसमत येथील सार्वजनिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा समितीच्या अथक परिश्रमाने हा पुतळा वसमतला साकारतो आहे .समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत ,छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे जोरदार स्वागत करण्याचे ठरले होते , त्यांना प्रतिसाद देत
वसमत येथील लिटल किंग्ज इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या वतीने वसमत शहरातून मूर्तीचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी शाळेच्या वतीने जोरदार तयारी करण्यात आली होती , ज्यात महाराष्ट्राचा पारंपरिक वेश धारण करीत शाळेतील 100 मुला – मुलींनी सहभाग घेतला , यावेळी मिरवणुकीत बँड पथक आणि लीटल किंग्ज इंग्लिश स्कूलचे विविध महाराष्ट्राच्या वेशभूषेतील भगवे फेटे परिधान केलेले विद्यार्थी आणि त्यांच्यासोबत शिवकालीन तोफ सर्व शिवप्रेमींचे लक्ष वेधून घेत होते हे विशेष , या मुळे मिरवणुकीला एक वेगळीच शिस्त आणि नियोजन केल्याचे जाणवत होते
या वेळी हजारोंच्या संख्येने शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्वारुढ पुतळ्याला पुष्प वर्षाव केला
या वेळी पुतळा समितीचे पदाधिकारी व हजारो शिवप्रेमीं उपस्थित होते .
विविध पक्षाचे आणि सर्व जाती धर्मातील नागरिक महिला भगिनी उपस्थिती होत्या ,
यावेळी हिंगोली लोकसभेचे प्रतिनिधी खासदार हेमंत पाटील, वसमत विधसनसभेचे प्रतिनिधी राजू नवघरे , माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर , माजीमंत्री जयप्रकाश मुंदडा , नगराध्यक्ष श्रीनिवास पोराजवार , टोकाई सहकारी साखर कारखाना अध्यक्ष शिवाजीराव जाधव , डॉ मारोती क्यातमवार , भाजपाचे उपाध्यक्ष शिवदासजी बोड्डेवार , शिवसेना तालुका प्रमुख राजू चापके , उज्वलाताई तांबाळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तानाजी भेंडे राजू पाटील इंगोले , काशिनाथ भोसले , माजी नगरसेवक राजेश इंगोले, पुतळा समितीचे सचिव सुनील भाऊ काळे , शाळेचे संस्थापक प्रा डॉ नामदेव दळवी यांनी शाळेतील या मुलांचे कोतुक केले ,
या विद्यार्थ्यांना शाळेचे मू अ गोविंद दळवी , कला शिक्षक सईम पिराजी , संगीता अडकीने यांनी मार्गदर्शन केले