राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त लिटल किंग्ज इंग्लिश स्कुल मध्ये विज्ञान प्रदर्शन .
वसमत
प्रतिनीधी
राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून लिटल किंग्ज इंग्लिश स्कुल वसमत येथे विज्ञान प्रदर्शन आयोजन करण्यात आले होते.
राष्ट्रीय विज्ञान दिवस आपण का साजरा करतो कारण दिनांक 28 फेब्रुवारी रोजी आपल्या देशाचे महान भौतिकशास्त्रज्ञ डॉ.चंद्रशेखर वेकटरमन यांचा जन्मदिवस असतो. आज ह्या रोजी त्यांनी केलेल्या संशोधनाबद्दल त्यांची आठवण केली जाते, त्यांचे भौतिकशास्त्रातील योगदान आणि त्यांचे संशोधन रमण इफेक्ट मुळे त्यांना विज्ञान क्षेत्रातील सर्वोच पुरस्कार नोबेल पुरस्काराने सन्मानित करणयात आले होते त्यांच्या महान कार्याची आठवण म्हणून आपण राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करतो
शाळेतील या प्रदर्शनात सुमारे 33 प्रयोगाचे सादरीकरण झाले.
या विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक गटात प्रथम क्रमांक – क्षितिजा हनवते (सॉईल प्रोफाइल) व्दितीय क्रमांक -आराध्या आगलावे आणि ईश्वरी जाधव ( वॉटर प्युरीफायर) आणि तृतीय क्रमांक – कस्तुरी पतंगे ( न्यूटन क्रयाडल) यांना देण्यात आले तर माध्यमिक गटात प्रथम क्रमांक – आर्यन खैरे (वॉटर सेंसर ) व्दितीय क्रमांक – यश उबारे (इलेक्ट्रिक बेल) आणि तृतीय क्रमांक – पृथ्वीराज अडकीने (वॉटर डीस्पेन्सर) याना देण्यात आले आणि प्रदर्शनातील विशेष उत्तेजनार्थ पारितोषिक आर्या नायक, नचिकेत देशमुख आणि राजदीप पतंगे (युजर फ्रेंडली मायक्रोस्कोप आणि टेलिस्कोप), प्रदीप जाधव आणि अर्थ जैस्वाल (स्मार्ट व्हिलेज ) आणि केशव कोटे आणि करण भालेराव (भूकंप सूचक यंत्र ) यास दिले गेले.
सर्व विद्यार्थी मित्रांना विज्ञान शिक्षक श्रवण कदम यांनी मार्गदर्शन केले. या वेळी शाळेतील पाचशे मुलांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला.