शाळेतील पहिलीची विद्यार्थिनी वेदिका अंभोरे हिने केले संविधान उद्देशिकेचे वाचन.
वसमत
प्रतिनिधी
वसमत शहरातील एक प्रयोगशील शाळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लिटल किंग्ज शाळेच्या कॅम्पस मध्ये शाळा उभारणी बरोबरच संविधान स्तंभाची उभारणी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईच्या विशेष मार्गदर्शनाने करण्यात आली आहे.
शाळेतील विद्यार्थ्यांना भारतीय राज्यघटनेची ओळख व्हावी भारताची राज्यघटना २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतास अर्पण करण्यात आली होती. त्याची आठवण म्हणून भारतात २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
ही माहिती विद्यार्थी जीवनात विद्यार्थ्यांवर संस्कार म्हणून व्हावी ही काळाची गरज ओळखून शाळेत या आभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शाळेत सकाळी नऊ वाजता. वसमत येथील शासकिय गुत्तेदार यशवंतराव ऊबारे यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून संविधान स्तंभास अभिवादन करण्यात आले.
भारतीय राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेचे वाचन शाळेतील इयत्ता पहिली ची विद्यार्थिनी वेदिका अंभोरे हिने केले. पालक प्रतिनिधि अंभोरे यांची उपस्थिती होती.
यावेळी शाळेतील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी शाळेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. नामदेव दळवी यांची उपस्थिती होती.