शाळेचे आठरा विद्यार्थी पास तर दहा विद्यार्थी महाराष्ट्र शासनाचे शिष्यवृत्तीधारक
वसमत,
प्रतिनीधी
वसमत शहरातील एक प्रयोगशील शाळा म्हणुन प्रसिद्ध असलेली लिट्ल किंग्ज शाळा शैक्षणिक क्षेत्रात आपला एक आगळावेगळा ठसा नेहमीच उमटवित असते , शाळेचे अनेक विद्यार्थी विविध सांस्कृतिक स्पर्धा, तालुका, जिल्हा, विभाग व राज्य पातळीवरील चमकत आसतात तसेच क्रिडा स्पर्धा, सायन्स, गणित, विज्ञान ओलंपियाड स्पर्धा , आर टी एस इ , गणित ओलंपियाड, सायन्स ओलंपियाड या
विवीध स्पर्धा परीक्षांमध्ये शाळेची गरूडझेप असते . त्यात आता शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेने गरुडझेप घेतली आहे .
शाळेने यावर्षी सुद्धा महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद, पुणे महाराष्ट्र शासन आयोजीत पूर्व उच्च प्राथमिकआणि उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता 5 वी आणि इयत्ता आठवी मधून यश संपादन केले आहे.
इयत्ता पाचवी तून कु.स्वरूपा नादरे, कृष्णा बोखारे, श्रद्धा माने, साई म्याकलवार, अनन्या मुळे हे विद्यार्थी पास झाले आसून पाच विद्यार्थी ज्यात धनजय चव्हाण, गजानन चव्हाण, संस्कृती शेजुळे, आणि विजया रावले हे पात्रता धारक ठरले आहेत. तर उच्य माध्यामिक मधून इयत्ता 8 वी तील विदयार्थी सोहम वाघीले, हर्षवर्धन सवंडकर, सोहम वाघमारे, सिया वाघीले , ऐश्वर्या कातोरे हे पाच विद्यार्थी पास झाले असून ऋतुजा बोखारे, राफे अफान कुरेशी, संकल्प कोम्पलवार बुधभूषण खंदारे विग्नेश मेहता . हे विदयार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्रता धारक ठरले आहेत.
या विद्यार्थ्यांना शाळेतील विविध विषयाचे शिक्षक यांनी मार्गदर्शन केले आहे.
या यशाबद्दल जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी संदिप
सोनटक्के, वसमत पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी तानाजीराव भोसले , केन्द्र प्रमुख रामराव जाधव, शाळेचे मुख्याध्यापक गोविंद दळवी, संस्थापक प्रा डॉ नामदेव दळवी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.