नॅशनल सायन्स ऑलंम्पियाड आणि नॅशनल मॅथ ऑलंम्पियाड स्पर्धा परीक्षांचा निकाल जाहीर
वसमत
प्रतिनीधी
सायन्स ऑलंम्पियाड फाऊंडेशन ,नवी दिल्ली . तर्फे घेण्यात आलेल्या, नॅशनल सायन्स ऑलंम्पियाड आणि नॅशनल मॅथ ओलंपियाड या स्पर्धा परीक्षेत वसमत शहरातील लिटल किंग्ज शाळेने घवघवीत यश संपादन केले आहे.
नॅशनल सायन्स ओलंपियाड ही स्पर्धा परीक्षा दि. २ डिसेंबर २०२२ रोजी घेण्यात आली होती .त्यात लिट्ल शाळेचे एकुण ९० विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी १६ विद्यार्थ्यांनी अतिशय उत्त़म कामगिरी करत सुवर्ण पदक मिळविले आहे.
त्यात अथर्व सोनटक्के, मयुर भालेराव, कू.शौर्या थोरात, अर्णव बहणे, कू.प्रणल दातार, कू.श्रेया झुंझुर्ल्डे, समर्थ महाजन, विश्वजीत अडकिणे, आर्यन थोरात, मनिष काळे, कू.आर्या लोखंडे, कू. विजया रावळे, पृथ्वीराज ढोरे, कू.अक्षरा बहणे, सार्थक डिगुळकर, सुरज चालक इ. विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
तर नॅशनल मॅथ ऑलंम्पियाड स्पर्धा परिक्षा हि दि .१३ डिसेंबर रोजी घेण्यात आली होती.
या परीक्षेत शाळेतील १०५ मुलांनी सहभाग नोंदविला होता , पैकी १६ मुलांनी गोल्ड मेडल मिळविले आहे.
त्यात कू.रिधी सोळंके , कू.सुप्रहा हिरवे, अर्णव बहने, कु. समृध्दी महाजन, कू. ईश्वरी अडकिने, पलक महाजन, प्रतीक कदम, समर्थ महाजन कू.दिव्या कऱ्हाळे, तेजस अडकीने, कू.आर्या लोखंडे कू. प्रांजली नरवाडे कू. आर्या नायक , सार्थक डीगुळकर , केशव कोटे सूरज चालक या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. नॅशनल मॅथेमॅटिक्स ओलंपियाड स्पर्धेत शाळेतील चार विद्यार्थ्यांची दुसऱ्या लेवल साठी सुद्धा पात्र म्हनून निवड झाली आहे .
ज्यात अर्णव बहने, कू. पलक महाजन, कू. आर्या लोखंडे आणि केशव कोटे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे .
या सर्व विद्यार्थ्यांना शाळेतील विज्ञान आणि गणित शिक्षक यांनी मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य केले आहे .
वसमत शहरातील एकमेव लिटल किंग्ज इंग्लिश स्कूल ही शाळा सायन्स ओलंपियाड स्पर्धा परीक्षेमध्ये सर्वाधिक विद्यार्थी बसऊन सर्वाधिक गोड मेडल प्राप्त करणारी शाळा ठरली आहे.
या परीक्षेत मिलेविलेल्या यशाबद्दल वसमत पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी तान्हाजी भोसले, तसेच डायटचे मा. प्राचार्य आणि अधिष्ठाता गणेश शिंदे, शाळेचे संस्थापक प्रा डॉ नामदेव दळवी, यांनी अभिनंदन केले आहे.