वसमत
प्रतिनिधि
वसमत तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात 65 स्पर्धकांनी नोंदविला सहभाग.
श्री सिद्धेश्वर विद्यालय वसमत या ठिकाणी दिनांक 3 /2/ 2023 रोजी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन सकाळी 10 ते 04 या वेळेमध्ये संपन्न झाले. या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये तालुक्यातील 14 केंद्रातील केंद्रस्तरीय विज्ञान प्रदर्शनात सहभागी असलेल्या 171 स्पर्धकांपैकी , केंद्रस्तरीय प्रदर्शनातून नंबर पटकावलेल्या विजेत्यांचे प्रदर्शन अत्यंत उत्कृष्टपणे सिद्धेश्वर विद्यालय वसमत या ठिकाणी उत्साहात संपन्न झाले.
यात वसमत येथील लिट्ल किंग्ज शाळा वसमत ने इयत्ता पाचवी वी ते आठवी या प्राथमिक गटातून प्रथम क्रमांक पटकावला आहे.
शाळेच्या विद्यार्थ्यानी युजर फ्रेंडली मायक्रोस्कोप बनविला होता.
मायक्रोस्कोपची सद्या बाजारात किमती 3000 ₹ पासून पुढे सुरू होते. ते अनेक हजारो रूपये लागतात , पण विद्यार्थ्यानी हा मायक्रोस्कोप फक्त तीनशे ते चारशे रुपयेत बनविला होता त्यामुळे इतर विद्यार्थ्यांना याचा उपयोग होऊ शकतो प्रत्येक जण हा मायक्रोस्कोप बनवू शकतो. आणि शोध लावू शकतो असे अनेक उपक्रम विद्यार्थ्यानी शाळेत राबविले आहेत.
या प्रयोगात इयत्ता सातवीत विद्यार्थी नचिकेत शिवाजी देशमुख, कु आर्या सुनील नायक, राजदीप विशाल पतंगे यांनी सहभाग घेतला होता.
या विद्यार्थ्याना विज्ञान शिक्षक श्रवण कदम यांनी मार्गदर्शन केले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
श्री सुभाष सोनटक्के साहेब ,गटशिक्षणाधिकारी वसमत
प्रमुख मार्गदर्शक म्हणुन
श्री काष्टे साहेब शिक्षण विस्तार अधिकारी वसमत बीट
श्री भोसले साहेब शिक्षण विस्तार अधिकारी कुरुंदा बीट शाळेचे मुख्याध्यापक
श्री बल्लमखाने सर
विज्ञान प्रदर्शनाचे नियोजनआणि व्यवस्थापन
श्रीमती दावलबाजे आर.एन
विषयतज्ञ
श्री भालेराव पी बी
विज्ञान शिक्षक
श्री राठोड आर.बी
विज्ञान शिक्षक यांनी केले होते.परीक्षक म्हणुन
प्रा.श्री कर्वे सर ,श्री टेकाळे सर यांनी काम पाहिले.
विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन गटशिक्षण अधिकारी श्री सोनटक्के साहेब यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. उद्घाटनाच्या प्रसंगी विस्तार अधिकारी श्री काष्टे साहेब श्री भोसले साहेब यांनी उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले याप्रसंगी सर्व केंद्रप्रमुख, सर्व विषय तज्ञ विशेष शिक्षक व विद्यार्थ्यांसोबत आलेले सर्व शिक्षक उपस्थित होते.
वरील सर्व विजेत्यांचे गट साधन केंद्र वसमत , शिक्षण विभाग वसमत आणि शाळेच्या च वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.