पालक, विद्यार्थी शाळा चालक काळजीत
संपादक
प्रा नामदेव दळवी
राज्यातील शाळा जून पासून सुरू करण्याचा मनोदय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला असला तरी शिक्षक आमदार शिक्षकांच्या विविध संघटना आणि पालक यांनी ह्याला विरोध केल्याचे दिसते आहे
जुलै-ऑगस्टमध्ये परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा अशी मागणी सामान्य पालकांतून होत आहे .शालेय शिक्षण मंत्री माननीय वर्षाताई गायकवाड यांनी गेल्या आठवड्यात राज्यातील शिक्षक आमदारांची बैठक घेतली त्यावेळी सर्व आमदारांनी शाळा जूनपासून सुरू करण्यास स्पष्टपणे विरोध दर्शविला होता .
मात्र रविवारी मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत जून महिन्यात शाळा सुरू करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आलेला आहे ,
महाराष्ट्र सरकारला स्वतंचे समाधान करून घेण्यासाठी 15 जून पासून शाळा सुरू करण्याच्या असतील तर फार मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे , मात्र भयग्रस्त पालक विद्यार्थी तसेच अन्य कामांमध्ये गुंतवून ठेवण्यात आलेले शिक्षक यांच्या मानसिकतेचा विचार केला तर सरकार निश्चितपणे या निर्णयावर पुन्हा विचार करेल असे वाटते आहे , शाळा सुरू करण्यापेक्षा विद्यार्थ्यांचा जीव महत्त्वाचा आहे . एकेका वर्गांमध्ये सध्यातरी 50 ते 60 विद्यार्थी असतील तर सामाजिक अंतर राखणे कसे शक्य आहे ? आणि सध्या शिक्षकांना कोरोनाचा सामना करण्यासाठी विविध कामे देण्यात आलेली आहेत त्यांना चेक नाक्यावर , दवाखान्यात सर्वेक्षणाची कामे देण्यात आलेली आहेत , आणखी काही दिवस त्यांची या कामातून सुटका होण्याची शक्यता दिसत नाही आणि जरी सुटका झाली तरी त्यांना पंधरा दिवस होम कॉरनटाईन राहावे लागणार आहे
म्हणजे जून महिन्याच्या शेवटी पर्यंत शिक्षक उपलब्ध होणार नाहीत
आणि अनेक जि प च्या शाळा बाहेरून आलेल्या मजुरांना त्या ठिकाणी कॉरर्नटाइन करण्यात आले आहे, त्या शाळांचे काय करणार ?
त्यामुळे लवकर शाळा सुरू करणे ही बाब व्यवहार्य होणार नाही आणि राहिला प्रश्न
ऑनलाईन शिकवणी कितपत योग्य
“”””””””””””””””””””””””
ऑनलाईन शिकवणीच्या यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत फार तर पंधरा ते वीस टक्केच मुलांपर्यंत ऑनलाइन शिक्षण पोहोचू शकेल असे मतही विविध जाणकारांनी व्यक्त केले आहे
आणि विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण मिळणार म्हणजे त्यांचा स्क्रीन टाईम वाढणार आहे ते आधीच पालकांचा मोबाईल हा गेम खेळायला गुपचूप घेत असतात , टीव्ही घरात चालत असतो त्यामध्ये मोबाईल वर शाळेने चार-चार तास ऑनलाईन एज्युकेशन घेतले तर मुलांचा स्क्रीन टाईम खूप वाढेल व त्यातून मुलांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होतील म्हणून सरकारने व शाळा व्यवस्थापनाने वयानुसार ऑनलाईन स्क्रीन टाईम ठेवून द्यावा तर थोड्या प्रमाणात हे शक्य होईल पण घरांमध्ये एकच पालकांकडे मोबाईल ऑनलाईन असल्याने तेही ग्रामीण भागात सतत नेटवर्कचा प्रॉब्लेम येत असल्याने खूप अवघड आहे,
इंग्रजी माध्यमाच्या शाळेसमोर मोठा पेच
“””””””””””””””””””””””
इंग्रजी माध्यमाच्या शाळांना शासन कुठले अनुदान देत नाही त्यामुळे पालकांनी भरलेल्या शालेय फी वरच या शाळेचे गुजराण चालत असते त्यामुळे कोरोनाणाच्या पार्श्वभूमीवर पालकांनी शाळेत प्रवेश नाही केले तर खूप मोठा पेज इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या व्यवस्थापनावर पडणार आहे , त्यातच आर टी इ चे शाळा फिस निधी अजूनही मागील अनेक वर्षाचा शासनाकडून इंग्रजी माध्यमाच्या शाळांना वितरित केला नाही !
त्यामुळे या शाळेतील शिक्षकांचे वेतन कसे देणार?
आणि शाळा व्यवस्थापन कसे चालणार ? आणि शाळांचेइमारतीचे भाडे कसे देणार ?
हा मोठा पेच इंग्रजी माध्यमाच्या शाळेसमोर असणार आहे,तरी या माध्यमातूनचालणाऱ्या शाळा व्यवस्थापनाने 9 वी आणि 10 वी चे वर्ग ऑनलाइन सुरू केले आहेत हे विशेष
त्यामुळे शाळा जूनमध्ये सुरू करणे अजिबात योग्य नसल्याचे विविध जाणकार मंडळी आपले मत व्यक्त करत आहेत