मा. नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी होऊच शकत नाही. ‘आज के शिवाजी… नरेंद्र मोदी’ हे पुस्तक खोटे आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज तडीपार नव्हते, त्यांच्यावर कुठलेही गुन्हे दाखल नव्हते किंवा त्यांनी नोट बंदीकरून रयतेला रांगेत उभारून जिवांत मारलं ही नव्हतं. तसेच शिवाजी महाराज मुळात ते क्रूर नव्हते. मात्र दुसर्या बाजूला संपूर्ण उलट चित्र आहे हे महाराष्ट्रासह देशाला माहित आहे. कारण त्यांच्यावर गुजरात मध्ये गुन्हे दाखल आहेत. भाजप शिवाजी महाराजांसोबत नरेंद्र मोदी यांची तुलना करून ‘काळा इतिहास पांढरा करण्याचा प्रयत्न करत आहेत.’ मा. श्याम जाजू महाराष्ट्राचे रहिवासी आहेत. ते गद्दार निघतील असं वाटलं नव्हतं. जाजू यांच्या डोळ्यासमोर शिवरायांशी तुला होत असताना ते मोदींच्या सत्तेपुढे इमान विकत बसले होते हे त्यातून स्पष्ट होतं. शिवाजी महाराजांसोबत मोदी यांची तुलना होऊ शकत नाही. *छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मा. नरेंद्र मोदी’सह कोणीही मोठा नाही… हे ‘वादग्रस्त पुस्तक 8 दिवसाच्या आत भाजप ने तात्काळ पाठीमागे घ्यावे’ अन्यथा… महाराष्ट्रातील एकही भाजप कार्यालय संभाजी ब्रिगेड ठेवणार नाही… असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी दिला.
श्याम जाजू यांच्या घरापासून भाजप कार्यालयाची तोडफोड करू हाच संभाजी ब्रिगेड इशारा देत आहे. असे ते म्हणाले
मा. नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत त्याबद्दल त्यांचा प्रचंड आदर आहे. मात्र तीन पट फालतू लेखक मा. नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत करत असेल तरी ही शिवरायांच्या महाराष्ट्राची आणि त्यांच्या कर्तृत्वाशी भाजपने केलेली गद्दारी आहे.
‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या भाजपच्या दिल्ली कार्यालयात या पुस्तकाचा व लेखकाचा व भाजप’चा निषेध…
या पुस्तक प्रकाशन युनायटेड हिंदू फ्रंटचे कार्यकारी अध्यक्ष आणि भाजपचे वरिष्ठ नेते जय भगवान गोयल यांनी यांच्या हस्ते पुस्तकाचे अनावरण करण्यात आले. धार्मिक सांस्कृतिक संमेलनामध्ये या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. भाजप दिल्ली प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी, प्रभारी श्याम जाजू, माजी खासदार महेश गिरी या नेत्यांच्या उपस्थितीत प्रकाशन सोहळा पार पडला. मात्र हा सोहळा नसून खोट्या इतिहासाचा व जाणीवपूर्वक केलेल्या विकृतीचा बाजार होता हेच या पुस्तकाच्या शिर्षकावरून व चित्रावरून स्पष्ट होते.
असे परखड मत संभाजी ब्रिगेड चे हिंगोली जिल्हाध्यक्ष सतीश पाटील जाधव महागावकर यांनी व्यक्त केले आहे,