लिटल किंग्जच्या जिजाऊ -सावित्री क्रीडा महोत्सवाची सांगता
वसमत,
प्रतिनिधी
विध्यार्थी हा ज्ञानाच्या क्षेत्रात अधाशासारखा असतो, त्याला बालवयात जसा आकार देता येईल तसा तो भविष्यात बनत असतो, फक्त शिक्षकांना त्याच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना ओळखता आले पाहिजे, त्याच्यातील एखादा गुण हेरून त्याला त्याक्षेत्रात संधी देता आली तरच तो त्या क्षेत्रात आयुष्यात स्वतःच्या पायावर उभा राहील,
निश्चितच हे ओळखण्याच काम जिल्ह्यातील पहिली प्रयोगशील शाळा म्हणून वसमतमधील लिटल किंग्ज इंग्लिश स्कूल करते आहे विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना चालना देणारी शाळा म्हणून या शाळेकडे बघितले जाईल असे मत वसमत येथील अहिल्यादेवी विद्यालयातील आदर्श शिक्षक यल्लप्पा मिटकर यांनी व्यक्त केले,
ते लिटल किंग्ज इंग्लिश स्कूल च्या जिजाऊ सावित्री क्रीडा महोत्सवाच्या समारोपीय बक्षीस वितरण कार्यक्रमात बोलत होते
कार्यक्रमात कोटे काकाजी, रावसाहेब पतंगे महाविद्यालयाचे प्राचार्य पांचाळ सर , विध्यार्थी प्रतिनिधी कु, शिंदे, केम्ब्रिज महाविद्यालयाचे प्रा
शाळेतील विध्यार्थी पालक उपस्थित होते,
मागील 10 दिवसापासून शाळेत आयोजित सुरू असलेल्या क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले,
पुढे बोलतांना मिटकर सर म्हणाले की सध्या खूप नवीन शाळा निघाल्यात पण एक आदर्श शाळा कशी असावी हे या शाळेकुंनच शिकावे .
शिक्षण, क्रीडा, कला, विज्ञानाच्या क्षेत्रात भविष्यात या शाळेतील मुलं विविध क्षेत्रात आपले नावं नक्कीच कमवितील आणि आम्हा वसमत करांना त्याचा अभिमान असेल असे ते म्हणाले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सइम पिराजी यांनी तर आभार मुख्याध्यापक गोविंद दळवी यांनी केले ,