वसमत
शहर प्रतिनिधी
राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर आणि जिल्हा परिषद, शिक्षण विभाग हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने 49 वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे अनुषंगाने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात वसमत येथील लिटल किंग्ज इंग्लिश स्कूल शाळेने माध्यमिक गटात सादर केलेल्या ‘ सोलार अँड हायड्रोलिक इलेक्ट्रिकल पावर ‘ आर्थात हायड्रोपोनिक शेती सह मत्स्यसंवर्धन तथा सौर ऊर्जा आणि जलविद्युत प्रकल्पावर काम करणारे स्मार्ट गाव. असा होता.
या विज्ञानाच्या प्रयोगाला द्वितीय क्रमांक मिळवला असून या प्रयोगाची राज्यस्तरावर निवड झाली आहे.
हा प्रयोग इयत्ता नववीचा विद्यार्थी प्रदीप जाधव याने शाळेतील विज्ञान विषयाचे शिक्षक श्रवण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेत सादर केला होता.
लिटल किंग्ज इंग्लिश स्कूलच्या या यशाबद्दल वसमत पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी तानाजीराव भोसले प्राथमिक, माध्यमिकचे गटशिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के , शाळेचे संस्थापक प्रा डॉ नामदेव दळवी आदींनी सहभागी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.