वसमत
शहर प्रतिनिधी
परभणी अॕस्ट्रॉनॉमिकल सोसायटी या संस्थेतर्फे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान वारीचे आयोजन करण्यात आले होते
दिनांक 28 फेब्रुवारी या दिवशी पुणे येथील आयुका(अवकाश संशोधन) संस्थेमध्ये परभणी व हिंगोली जिल्ह्यातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांचा समावेश केला जातो
विद्यार्थ्यांना आयुका संस्था दाखविल्या जाते व अवकाश विज्ञान या विषयी अधिक माहिती तेथे देण्यात येते. याच उपक्रमाला ‘विज्ञानवारी’ असे नाव देण्यात आले आहे.
यामध्ये यावर्षी इयत्ता सातवी व आठवी या इयत्तेतून एक विद्यार्थी निवडण्यात येतो.या वर्षीपासून एका शाळेतून एक विद्यार्थी निवडण्यात येत असतो
या शाळांमध्ये जिल्हा परिषद , आश्रम शाळा , खाजगी संस्था आणि इंग्लिश स्कूल यांचा समावेश करण्यात आला होता
यावर्षी विज्ञानवारीची परीक्षा दिनांक 11 फेब्रुवारी रोजी सकाळी संबंधित शाळेमध्ये निर्धारीत वेळेमध्ये घेण्यात आली होती
हि परीक्षा 30 गुणांची व 30 पर्यायी प्रश्नांची(MCQ) होती व परीक्षेचे माध्यम दोन्ही मराठी व इंग्रजी भाषा होते
परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम आपल्या पाचवी ते दहावीच्या भूगोल व विज्ञानाठच्या पुस्तकातील खगोलशास्त्र यावरील आधारित पाठांवर आधारित तसेच खगोलशास्त्रातील चालू घडामोडींवर विविध प्रश्न विचारण्यात आले होते
प्रत्येक शाळेतून फक्त एकच विद्यार्थी निवडणे बंधनकारक असे होते त्यामधून वसमत येथील लिटल किंग्ज इंग्लिश स्कूल ची कु इशिता देशमुख हिची निवड झाली आहे
तिचे शाळेचे मु अ गोविंद दळवी , शाळेचे संस्थापक नामदेव दळवी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या ,