इंग्रजी शाळेच्या समस्यावर होणार विचार मंथन
प्रतिनीधी
महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन, जिल्हा नांदेड च्या वतीने “ELIXIRIC QUEST” An Edu-Symposium ही मराठवाडा स्तरीय पहिली शिक्षण परिषद नांदेड च्या जवळील सह्याद्री इंग्लिश स्कूल, पार्डी ता. लोहा येथे रविवार, दि. 18 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत होणार आहे.
महाराष्ट्राचा विचार करता अजूनही मराठवाडा शैक्षणिक दृष्ट्या बराच मागे आहे. त्यातही फीस बेसिस वर चालणाऱ्या शाळांच्या मोठ्या समस्या आहेत. NEP ( National Education Policy) ची अमलबजावणी लवकरच होणार आहे. आपल्या समस्या व NEP बाबत आपल्याला जागरूकपणे संघटित होऊन काम करावे लागेल आणि मेस्टा सरळ महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकारकडे या बाबतीत पाठपुरावा करण्यात सर्वात पुढे आहे. सध्या मेस्टा लावून धरलेले काही मुद्दे आहेत यावरच नांदेड च्या या परिषदेत ठोस भूमिका घेतली जाणार आहे. आणि विचार मंथन केल्या जाणार आहे जी आपल्या सर्व शाळांसाठी महत्वाची असणार आहे. त्यामुळे आपण सर्वांनी आवर्जून या परिषदेला आपल्या सहकाऱ्यांसह उपस्थित राहावे. असे आवाहन नांदेड जिल्हा इंग्रजी शाळा संस्थाचालक संघटना ( मेस्टा ) यांनी केले आहे.
या परिषदेसाठी उद्घाटक म्हणून खासदार प्रताप पाटील चिखलीकर , अध्यक्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय तायडे पाटील , प्रमुख अतिथी म्हणून लोह्याचे आमदार श्यामसुंदर शिंदे, दक्षिण नांदेड चे आमदार मोहन अण्णा हंबर्डे, नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर,
विशेष उपस्थिती म्हणून एकनाथराव पावडे .राज्यकर उपायुक्त जीएसटी यवतमाळ, डॉ. गणपतराव मोरे .शिक्षण उपसंचालक लातूर .सुधाकर तेलंग अध्यक्ष विभागीय शिक्षण मंडळ लातूर , दत्तात्रय मठपती सहाय्यक .संचालक लातूर , प्रशांत दिग्रसकर शिक्षणाधिकारी माध्यमिक नांदेड . सविता बिरगे. शिक्षणाधिकारी प्राथमिक नांदेड ,प्रा डॉ.नामदेव दळवी प्रदेश अध्यक्ष मेस्टा संघटना , विजय पवार कार्याध्यक्ष मराठवाडा , अनिल आसलकर, प्रदेश संघटन महाराष्ट्र. मनीष हांडे कोषाध्यक्ष महाराष्ट्र . अभिजीत देशमुख विदर्भ अध्यक्ष. गणेश मेड, मराठवाडा अध्यक्ष, इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार असून दुसऱ्या सत्रात इंग्रजी माध्यम शाळांच्या सद्यस्थितीचा आढावा राष्ट्रीय शिक्षण धोरण आणि भविष्यात निर्माण होणाऱ्या प्रश्नांसंदर्भात चर्चा केली जाणार आहे.
परिषदेतील महत्वाचे विषय
1) शाळा संरक्षण कायदा व्हावा. शाळा व शाळा संचालकांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे. ज्या प्रमाणे हॉस्पिटल आणि डॉक्टर साठी अत्यंत प्रभावी संरक्षण कायदा आहे तसाच कायदा शाळांसाठी व्हावा.
2) RTE रक्कम 17349 वरून 25 हजार करण्यात यावी ( 2015-16 पासून वाढ झाली नाही).
3) RTE प्रतिपूर्ती रक्कम त्याच शैक्षणिक वर्षात मिळावी.
4) शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र (TC) अनिवार्य असावी आणि TC नेण्यापूर्वी शाळेची मागील फीस जमा करावी लागेल.
5) RTE चे विध्यार्थी मधूनच ( 2 री नंतर) शाळा सोडून जातात ती रिक्त जागा भरली जावी.
6) शाळांच्या स्कूल बसेस च्या Tax चा विषय सगळ्यांसाठीच अडचणीचा झाला आहे. सर्वच स्कूल बस चा कोरोना काळातील व चालू वर्षातील Tax माफ झाला पाहिजे.
7) इंग्रजी शाळांच्या विध्यार्थ्यांना देखील सर्व शिष्यवृत्ती चा लाभ मिळाला पाहिजे.
8) दर्जावाढ च्या जाचक अटी रद्द करून नैसर्गिक वर्ग वाढ मिळाली पाहिजे.
9) PT प्रोफेशन टॅक्स हा आता कळीचा विषय होत चालला आहे. शाळांची विध्यार्थी संख्या वाढली, शिक्षक वाढले की, आर्थिक व्यवहार वाढले की नवीनच अडचणी समोर उभ्या राहत आहेत. शाळा काय सुविधा किंवा इन्फ्रास्ट्रक्चर देत आहे हे न पाहता त्यांना अडचणीत आणण्याचे प्रकार सुरू आहेत त्यावर एकत्रीत संघटित व्हावेत लागेल. कारण आज जे सुपात आहेत ते उद्या जात्यात जाणारच आहेत, तेव्हा उद्या येणाऱ्या समस्येचे निराकरण आजच करु आणि त्यासाठी संघटित होऊ. असा निर्धार संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
या महत्वाच्या विषया बरोबरच इतर ही विषय आहेत. यासाठी इंग्रजी शाळा संस्थाचालक संघटनेच्या वतीने संघटित होणे गरजेचे आहे. या साठी इतर कुणी करेल याची वाट न पाहता स्वतः सहभागी व्हा ही नम्र विनतीकेली आहे .
मेस्टा सदस्य शाळांची कोरोना काळात फीस कपात होणार नाही असा निर्णय मेस्टा ने घ्यायला महाराष्ट्र शासनाला भाग पाडले भाग पाडले. हीच मेस्टा ची ताकत आहे. नांदेड च्या या आपल्या परिषदेत क्रियाशील सहभाग नोंदवावा असे आवाहन प्रा .सुदर्शन शिंदे राज्यसह संघटक, प्रा शिवाजी उमाटे .जिल्हाध्यक्ष नांदेड भारत होकर्ण मराठवाडा सचिव , नांदेड . आणि जिल्हा शाखे च्यावतीने करण्यात आले आहे.